श्रीमुद्गलपुराण – ११
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात. […]
भगवान श्रीगणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचा एकमेव मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण. तब्बल ९ खंड, ४२८ अध्याय, २४००० श्लोकसंख्या इतका या ग्रंथाचा अफाट विस्तार. प्रत्येक कथा आश्चर्यकारक, तत्वज्ञानाची सहज सोपी उकल, पानापानावर भगवान गणेशाबद्दल कधी विचारही केला नसेल अशा अपूर्व ज्ञानाचा संग्रह म्हणजे श्रीमुद्गलपुराण!
याच मुद्गल पुराणाचा विस्मयकारी परिचय घडवीत आहेत गाणपत्य संप्रदायाचे अभ्यासक, संशोधक, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात. […]
भगवान श्री शंकरांनी स्थापिलेले श्री क्षेत्र रांजणगाव, भगवान श्री विष्णूंनी तपस्या केलेले श्रीक्षेत्र सिद्धटेक, भगवान ब्रह्मदेवांची तपोभूमी श्रीक्षेत्र थेऊर, देवी पार्वतीची आराधना क्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री, भगवान श्री सूर्य स्थापित श्री हेरंब गणेश श्रीक्षेत्र काशी अशा रुपात पंचेश्वरांनी केलेली गणेशोपासना पाहता येते. […]
श्री मुदगल पुराणाने वर्णिलेल्या अष्टविनायकांची मूळ स्थाने भारताच्या आठ दिशेला आठ आहेत. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव येथे मोरयाच्या मंदिरात आठ दिशांना या आठ विनायकांच्या मूर्ती स्थापित आहेत. भगवान श्रीमयुरेश्वर यांच्या पूजनानंतर पूर्वेकडून अनुक्रमे भगवान श्री वक्रतुंड, श्री एकदंत, श्री महोदर, श्री गजानन, श्री लंबोदर, श्री विकट,श्री विघ्नराज आणि श्री धूम्रवर्ण अशा या आठ विनायकांची पूजन करायचे असते. वेगळ्या शब्दात एकाच मंदिरात संपूर्ण भारताची यात्रा करण्याची सुविधा आहे श्रीक्षेत्र मोरगाव. […]
श्री मुद्गल पुराणाचा चौथा खंड चतुर्थी वर्णनाला समर्पित आहे. बारा महिन्यात येणाऱ्या प्रत्येकी दोन अशा चोवीस आणि अधिक मासातील दोन अशा सव्वीस चतुर्थीच्या प्रत्येकी दोन अशा बावन्न कथा तेथे पाहावयास मिळतात. […]
श्री मुद्गल पुराण सांगते की हे सर्व विकार आपल्याला “सह-ज” रूपात मिळाले आहेत. अर्थात हे सर्व विकार जन्मापासून आपल्यासोबत आहेत. खरेतर जन्माच्या आधीपासून सोबत आहेत. या विकारांनी, या वासनांनी युक्त असल्यामुळे जन्माला यावे लागते असे शास्त्र सांगते. […]
राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण. […]
श्रीमुद्गल पुराणातील आठ खंडातील या आठ कथा आपण जर वरपांगी केवळ वाचत गेलो तर आपल्याला एक गोष्ट विचित्र वाटू शकते ती अशी की वर वर पाहता या आठही कथा सारख्याच आहेत. […]
आत्मविस्मृत दक्ष प्रजापतींना आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी भगवान श्री मुद्गलांनी सांगितलेल्या या पुराणात एकूण नऊ खंड आहेत. आपल्याच आठ विद्यमान विकारांना आपल्याच आत विद्यमान विनायकांनी नियंत्रित करण्याची साधना आहे श्रीमुद्गलपुराण. […]
महर्षी मुद्गलांनी दक्षप्रजापतींना दिलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. महर्षी मुद्गल यांनी सांगितले म्हणून त्याला मुद्गल पुराण असे म्हणतात. ईश्वरी उपासनेचा आनंद देणाऱ्या या भारताला स्वर्ग पेक्षाही श्रेष्ठ मांडणाऱ्या महर्षी मुद्गलांनी आयुष्याचा स्वर्ग करण्याचा दिलेला राजमार्ग आहे श्रीमुद्गलपुराण. […]
परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे विविध अंगाने स्पष्टीकरण करणाऱ्या श्रीमुद्गलपुराणाच्या निर्मितीचा इतिहासही मोठा अलौकिक आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions