भगवान श्रीगणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचा एकमेव मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण. तब्बल ९ खंड, ४२८ अध्याय, २४००० श्लोकसंख्या इतका या ग्रंथाचा अफाट विस्तार. प्रत्येक कथा आश्चर्यकारक, तत्वज्ञानाची सहज सोपी उकल, पानापानावर भगवान गणेशाबद्दल कधी विचारही केला नसेल अशा अपूर्व ज्ञानाचा संग्रह म्हणजे श्रीमुद्गलपुराण!
याच मुद्गल पुराणाचा विस्मयकारी परिचय घडवीत आहेत गाणपत्य संप्रदायाचे अभ्यासक, संशोधक, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड
या पुराणाचा विषय आहेत भगवान श्री गणेश. पर्यायाने अंतिम सत्य काय तर श्री गणेश. सर्वोच्च सत्ता कोणती तर भगवान श्री गणेश.अनादी,अनंत, निर्गुण, निराकार, परब्रह्म काय तर भगवान श्री गणेश. त्या भगवान श्रीगणेशांना जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण. […]