वृद्धावस्थेत विविध व्याधींच्या द्वारे जीवाची होणारी दयनीय अवस्था सर्वच विचारवंतांनी चिंतनाचा विषय केलेली आहे. त्यावेळी त्याला भगवंता शिवाय कोणाचाही आधार उरत नाही. अशावेळी भगवंताची प्रार्थना करणारा तो जीव ज्या प्रकारची करुणा भाकतो त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….. […]
तारुण्यामध्ये स्वतःच्या क्षमतांनीच आपण सर्व काही करतो असे वाटत असणाऱ्या जीवाला जसे जसे वृद्धत्व प्राप्त होत जाते तस तशी त्याची ही क्षमता कमी होत जाते. मग त्याच्या भरवशावर असलेला ताठा देखील नष्ट होतो. अशावेळी त्याला भगवंता शिवाय कशाचाही आधार नसतो. त्याच्या या निराधार अवस्थेचा विचार व्यक्त करताना आचार्य श्री म्हणतात… […]
भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही. […]
भगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो. […]
भगवान श्रीविष्णूच्या अतीव आनंददायी स्वरुपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…. परम चैतन्य युक्त, त्याच सोबत सत् आनंद संवित् चा एकत्र अर्थ केला तर सच्चिदानंद स्वरूप असणारे भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो. […]
भगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो. […]