अनेन स्तवेनादरादंबिकेशं परां भक्तिमासाद्य यं ये नमंति | मृतौ निर्भयास्ते जनास्तं भजंते हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् ‖ ३९ ‖ आता स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सादर करावीत अशा स्वरूपातील या दोन श्लोकांमध्ये आचार्य श्री प्रस्तुत स्तोत्राच्या पठना चे लाभ व्यक्त करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात या स्तोत्राचा पठनाची पद्धती मांडताना आचार्यश्री म्हणतात, अनेन स्तवेनादरादंबिकेशं – या स्तवनाच्या द्वारे ची आदरपूर्वक […]
किरीटे निशेशो ललाटे हुताशो भुजे भोगिराजो गले कालिमा च | तनौ कामिनी यस्य तत्तुल्यदेवं न जाने न जाने न जाने न जाने ‖ ३८ ‖ विवेचनाच्या ओघात शिवोऽहम् ही आत्म स्वरूपाची जाणीव झाली आणि क्षणात समाधिस्थ झालेले आचार्य त्या अनुभूतीचे वर्णन करून गेले. प्रारब्धवशात पुनश्च देह भानावर आले. जसा झोपेतून उठलेला माणूस झोपण्यापूर्वीच्या विचारांना पुन्हा प्राप्त […]
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं स्थितिं याति यस्मिन्यदेकांतमंते | स कर्मादिहीनः स्वयंज्योतिरात्मा शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३७ ‖ जगद्गुरू स्वरूपात कृपाळू असल्याने जरी भक्तांच्या साधन रूपात आचार्य श्री विविध देवतांच्या अत्यंत रसाळ स्तोत्रांची निर्मिती करीत असले तरी त्यांचा मूळ पिंड निर्गुण निराकार उपासक वेदांती असाच आहे. प्रत्येक देवतेकडे देखील ते तसेच पाहतात. मागील श्लोकात शिवोऽहम् चा उल्लेख […]
महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् | शिवादन्यथा दैवतं नाभिजाने शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖ भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते. आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे, महादेव – […]
अकंठेकलंकादनंगेभुजंगाद- पाणौकपालादफालेऽनलाक्षात् | अमौलौशशांकादवामेकलत्राद- हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖ एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक. आचार्यश्री म्हणतात, अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग […]
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि प्ररोहै- रवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः | अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै- रचंद्रार्धचूडैरलं दैवतैर्नः ‖ ३४ ‖ भगवान श्री भोलेनाथच्या ठायी असणाऱ्या अनन्य शरणतेला व्यक्त करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्री शंकरांच्या विविध वैभवांचे वर्णन करीत आहेत. या वैभवांनी युक्त असे भगवान शंकर माझे दैवत आहे ही सांगण्याची त्यांची पद्धत मोठी मनोज्ञ आहे. ते म्हणतात, अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि- ज्यांच्या मस्तकावरील डोळ्यामधून […]
अमर्यादमेवाहमाबालवृद्धं हरंतं कृतांतं समीक्ष्यास्मि भीतः | मृतौ तावकांघ्र्यब्जदिव्यप्रसादाद्भवानीपते निर्भयोऽहं भवानि ‖ ३० ‖ महाभारतामध्ये आलेल्या विश्व प्रसिद्ध अशा यक्ष धर्मराज संवादात यक्षाने एक प्रश्न विचारला आहे की या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? त्यावर उत्तर देताना श्री धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की जगामध्ये असंख्य लोकांना रोज मरतांना पाहून देखील पाहणारा स्वतःला अमर समजतो यापेक्षा मोठे आश्चर्य नाही. […]
इदानीमिदानीं मृतिर्मे भवित्री- त्यहो संततं चिंतया पीडितोऽस्मि | कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा नमस्ते गतीनां गते नीलकंठ ‖ २९ ‖ या विश्वाचे स्वरूप अनिश्चित आहे. येथे कोणत्याच गोष्टीचे निश्चित पूर्वानुमान करता येत नाही. मात्र या अनिश्चित जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे हे जग कधीतरी सोडावे लागणार आहे. मृत्यू एवढे एकच अटळ सत्य आहे. त्यात […]
यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् | तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖ याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना. “अंत भला तो सब भला” ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक. आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत. ते म्हणतात, श्वेतपत्रायत […]
यदा रौरवादि स्मरन्नेव भीत्या व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् | तदा मामहो नाथ कस्तारयिष्यत्यनाथं पराधीनमर्धेंदुमौले ‖ २७ ‖ सर्वसामान्य संसारी जीवांची अंतिम समयी जी भयावह अवस्था निर्माण होते त्याचे आचार्यश्री आपल्यासाठी वर्णन करीत आहेत. त्यावेळी आपला उद्धार व्हावा यासाठी खरे तर आपल्या करिता प्रार्थना करीत आहे. आपल्याकरिता यासाठी म्हटले की ही आचार्यश्रींनी अवस्था नाही. ते आपल्या अवस्थेची […]