दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् | भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖ भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान […]
शिरो दृष्टि हृद्रोग शूल प्रमेहज्वरार्शो जरायक्ष्महिक्काविषार्तान् | त्वमाद्यो भिषग्भेषजं भस्म शंभो त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय ‖ १५ ‖ जगद्गुरूंच्या अफाट संदर्भ विश्वाची चुणूक दाखवणारा हा श्लोक. आरंभीच्या दोन चरणात त्यांनी विविध रोगांची सूची सादर केली आहे. शिरो – डोक्याशी संबंधित रोग, दृष्टि- दृष्टीशी संबंधित रोग, हृद्रोग- हृदयाशी संबंधित रोग, शूल – आयुर्वेदात वर्णिलेले वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, आमज, वातश्लैष्मिक, […]
स्तुतिं – हे भगवान शंकरा आपली स्तुती अर्थात स्तवन कसे करावे? ध्यानं- आपल्या दिव्य स्वरूपाचे ध्यान कसे करावे? अर्चां – आपले अर्चन अर्थात पूजा इ. कसे करावे? यथावद्विधातुं – याचे नेमके शास्त्रीय विधान काय आहे? भजन् अप्यजानन्- हे न जाणता देखील आपले भजन करीत, महेशावलंबे – हे भगवान महेशा !मी आपला आश्रय घेत आहे. अर्थात काहीही […]
न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश | तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖ काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो. वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते. अशीच काहीशी […]
पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव | द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖ कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत. ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या […]
अयं दानकालस्त्वहं दानपात्रं भवानेव दाता त्वदन्यं न याचे | भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖ भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत. ते म्हणतात, अयं दानकाल:- […]
त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति प्रसीद स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् | न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि – स्ततो मे दयालो सदा सन्निधेहि ‖ १० ‖ भक्ताच्या आणि भगवंताच्या आगळ्यावेगळ्या नात्याचे विवेचन करताना आचार्यश्री म्हणतात, त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति – माझ्यासारख्या प्रपन्न अर्थात संसारातील दुःखांनी त्रस्तझाल्यानंतर शरण येणाऱ्यांसाठी सुख,शांती, समाधानाच्या प्राप्तीचे आपल्यासारखे अन्य स्थान नाही. प्रसीद – त्यामुळे आपल्याला शरण आलेल्या […]
नमन्मौलिमंदारमालाभिषिक्तम् | नमस्यामि शंभो पदांभोरुहं ते भवांभोधिपोतं भवानी विभाव्यम् ‖ ६ ‖ स्मरणा नंतरची अवस्था असते वंदन. भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी सिद्ध भगवान जगद्गुरु आचार्यश्री त्या भगवान श्री विश्वनाथांच्या चरणकमलांचे माहात्म्य सांगताना म्हणतात, स्वसेवासमायात- सेवा करण्यासाठी स्वतः एकत्रित आलेल्या, देवासुरेंद्रा- देवता तथा सुरेंद्र म्हणजे देवराज इंद्र. नमन्मौलि- त्यांनी नमन् म्हणजे झुकविलेल्या मौली म्हणजे […]
प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् | गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः स्मरामि स्मरापत्तिसंपत्तिहेतोः ‖ ५ ‖ निर्माण आणि प्रलय दोन्हींची नियामक महाशक्ती आहेत भगवान शंकर. त्यांचे सदाशिव रूप निर्माणाचे अधिष्ठान आहे तर रुद्र हे विनाशाचे संचालक. या दोन्हींच्या समन्वयातून साकारलेल्या भगवान शंकरांचे स्वरूप सांगतांना आचार्यश्री म्हणतात, प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं- प्रवाळ म्हणजे पोवळे नावाचे रत्न. त्याचा प्रवाह म्हणजे त्यातून बाहेर पडणारे तेज. त्याची […]
शिवेशानतत्पूरुषाघोरवामादिभिः पंचभिर्हृन्मुखैः षड्भिरंगैः | अनौपम्य षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं परं त्वां कथं वेत्ति को वा ‖ ४ ‖ भगवान श्रीशंकरांच्या अगम्यतेचे वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात, शिवेशानतत्पुरुषाघोरवामादिभिः पंचभिर्हृन्मुखैः- शिव, ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव या पाच प्रसन्न मुखांनी. येथे भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाचे वर्णन आले आहे. यातील शिव किंवा ज्याला सद्योजात असेही नाव आहे ते जलतत्वाचे, ईशान हे पृथ्वी […]