मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां – पूर्णेन्दुवक्त्र प्रभां शिञ्जन्नूपुरकिंकिणिमणिधरां पद्मप्रभाभासुराम् । सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ २॥ आई जगदंबेच्या लोकविलक्षण सौंदर्याचे तथा तिच्या दिव्य तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करतांना, आचार्य श्री प्रथम दोन चरणात आईने धारण केलेल्या अलंकारांचे आणि त्यांनी फुललेल्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां- मोत्यांचे हार लटकत असल्यामुळे अधीकच शोभून दिसणाऱ्या मुकुटाने सुशोभित असणारी. […]
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां केयूरहारोज्ज्वलां बिम्बोष्ठीं स्मितदन्तपंक्तिरुचिरां पीताम्बरालंकृताम् । विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां तत्वस्वरूपां शिवां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ १॥ मीन म्हणजे मासोळी. अक्ष म्हणजे डोळे. जिचे डोळे मासोळी प्रमाणे लांब, दोन्हीकडे निमुळते, त्यातही कानाकडे अधिक वाढलेले आणि मध्यभागी विशाल असतात ती मीनाक्षी. मासोळीचे डोळे टपोरे असतात. तसे जिचे नेत्र ती मीनाक्षी. अशा प्रकारच्या सुंदर नेत्रांनी सुशोभित आई जगदंबे चे […]
प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना- द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः । वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥ या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात, प्रातःकाले – या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे. भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव […]
आशापाशक्लेशविनाशं विदधानां पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् । ईशामीशार्धाङ्गहरां तामभिरामां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १०॥ भगवंताचे, भगवतीचे सगळ्यात मोठे वैभव म्हणजे भक्तवत्सलत्व. आपल्या भक्तांच्या सकल मनोकामना पूर्ण करणे हे जणू देवतांचे सर्वाधिक प्रिय कार्य. आई जगदंबेच्या या शरणागतवत्सल स्वरूपाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, आशापाशक्लेशविनाशं विदधानां पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् । पादांभोज म्हणजे चरणकमलांचे, ध्यान करण्यात परायण असणाऱ्या पुरुष […]
नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका । कल्याणीं तां कल्पलतामानतिभाजां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ९॥ या जगाच्या अंतर्गत प्रवाहित मूलशक्ती स्वरूपात विश्वसंचालन करणाऱ्या आई जगदंबेच्या लीलेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका । विविध आकार धारण करून या विश्वाची केंद्रीभूत असणारी ही आई जगदंबा संपूर्ण विश्वाला व्यापून मुक्तपणे स्वतःच्या इच्छेनुसार एकटीच […]
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला- सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च । तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ८॥ या विश्वाची उत्पत्ती आई जगदंबे पासून होते हे सांगितल्यानंतर, ज्यावेळी हे विश्व दृशमान असते त्यावेळी आई जगदंबेचे स्थान नेमके काय? हे स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी ही रचना साकारली आहे. आई जगदंबे च्या विश्व जननी स्वरूपानंतर विश्वाधिष्ठान स्वरूपाबद्दल बोलताना आचार्यश्री म्हणतात, यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला- […]
यस्याः कुक्षौ लीनमखण्डं जगदण्डं भूयो भूयः प्रादुरभूदुत्थितमेव । पत्या सार्धं तां रजताद्रौ विहरन्तीं गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ७॥ आई जगदंबा गौरीच्या विश्वजननी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्रींनी या श्लोकाची रचना केली आहे. कोणत्याही मानवी जीवाची रचना मातृगर्भात असणाऱ्या बीजांडा पासून होत असते. या बीजांडा पासून अनंत कोटी ब्रह्मांडांपर्यंत सर्वत्र विद्यमान चैतन्य शेवटी आई जगदंबेचे आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्रींनी अशी […]
नित्यः शुद्धो निष्कल एको जगदीशः साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च । विश्वत्राणक्रीडनलोलां शिवपत्नीं गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ६॥ निर्गुण निराकार परब्रह्माची मूलशक्ती आदिमाया जगदंबा हीच सर्व कार्यामागे असलेले मूळचैतन्य आहे. हे स्पष्ट करताना आचार्य श्री प्रथम चरणात परब्रह्माचे वर्णन करीत आहेत. त्या परमात्म्या बद्दल ते म्हणतात, नित्यः – परमात्मा नित्य आहे. अर्थात भूत, वर्तमान व भविष्य काळात तो […]
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् । येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां सुखरूपां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ५॥ आई जगदंबेचे मानवी शरीरातील सूक्ष्मतम अस्तित्व म्हणजे कुंडलिनी शक्ती. नाभीजवळ साडेतीन वेटोळ्यात, वर्तुळाकारात ती सुप्तावस्थेत असते. तिचा रंग अत्यंत आकर्षक लालबुंद वर्णिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, नागिनचे पोर कुंकुमे अर्चिले , अशा सुंदर उपमेने तो लाल रंग दाखवितात. योगमार्गाने या आदिशक्तीला जागृत केल्यानंतर […]
आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं भूते भूते भूतकदम्बप्रसवित्रीम् । शब्दब्रह्मानन्दमयीं तां तटिदाभां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ४॥ आई जगदंबेचे अतुलनीय वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं- अ पासून क्ष पर्यंत सर्व अक्षरांच्या स्वरूपात विलास करणारी. यामध्ये अ पासून म्हणतांना सर्व अक्षरांपासून तर क्ष पर्यंत म्हणताना सर्व जोडाक्षरां पर्यंत असा भाव अंतर्हित आहे. सामान्य शब्दात सकल विद्या, सकल ज्ञान. सर्व शास्त्र […]