नवीन लेखन...

जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

कल्याणवृष्टिस्तव – ९

हन्तॆतरॆष्वपि मनांसि निधाय चान्यॆ भक्तिं वहन्ति किल पामरदैवतॆषु । त्वामॆव दॆवि मनसा समनुस्मरामि त्वामॆव नौमि शरणं जननि त्वमॆव ॥ ९ ॥ आई जगदंबेच्या एकमेवाद्वितीय सर्वश्रेष्ठत्वाला अधोरेखित करताना आचार्य श्री म्हणतात, हन्त- अरेरे! या अर्थाचा हा उद्गार. कितीही समजावून सांगितले तरी न ऐकणाऱ्या सामान्य दीन जनांकडे पाहून आलेला हा कनवाळू उद्गार आहे. काय समजावून सांगत होते आचार्य? […]

कल्याणवृष्टिस्तव – ८

कल्पद्रुमैरभिमतप्रतिपादनॆषु कारुण्यवारिधिभिरम्ब भवत्कटाक्षैः । आलॊकय त्रिपुरसुन्दरि मामनाथम् त्वय्यॆव भक्तिभरितं त्वयि बद्धतृष्णम् ॥ ८ ॥ आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाचे वैभव सांगतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत की दृष्टीनेच या जगात सर्व काही प्राप्त होऊ शकते. आई सर्वकाही देते पण त्यासाठी आपण तिचे भक्त असणे अपेक्षित आहे. अभिमत- साधकाला, भक्ताला, उपासकाला, जे जे हवे असते ते. […]

कल्याणवृष्टिस्तव – ७

सर्वज्ञतां सदसि वाक्पटुतां प्रसूतॆ दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः । किं च स्फुरन्मकुटमुज्ज्वलमातपत्रं द्वॆ चामरॆ च महतीं वसुधां ददाति ॥ ७ ॥ आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की कोणकोणते अतिदिव्य लाभ होतात, हे सांगतांना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः- हे आई जगदंबे तुझ्या अंघ्री म्हणजे चरण, सरसीरूहयो: म्हणजे कमलावर जो कोणी वंदन […]

कल्याणवृष्टिस्तव – ६

हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानःक्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः । नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य ॥ ६ ॥ आई भगवतीच्या साहचर्याचा अद्भुत वैभवशाली परिणाम सांगताना आचार्यश्री समुद्रमंथन प्रसंगाचा संदर्भ घेतात. अमृताच्या प्राप्तीसाठी झालेल्या या समुद्रमंथनात त्या मेरू पर्वताच्या भोवती गुंडाळलेल्या वासुकी सर्पाने ती पीडा सहन न झाल्याने भयानक गरळ ओकले. जोपर्यंत हे कोणी घेणार नाही तोपर्यंत […]

कल्याणवृष्टिस्तव – ५

ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ । त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥ कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात. या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात. तर त्या […]

कल्याणवृष्टिस्तव – ४

लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनंकारुण्यकन्दलित कान्तिभरं कटाक्षम् । कन्दर्पकॊटिसुभगास्त्वयि भक्तिभाजः सम्मोहयन्ति तरुणीर्भुवनत्रयॆऽपि ॥ ४ ॥ खरी बुद्धिमत्ता ती जी इतरांना बुद्धी संपन्न करते. खरे वैभव ते जे इतरांना वैभवसंपन्न करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य तेच की ज्याच्या संपर्काने इतरांना सौंदर्य प्राप्त होते. आई जगदंबेचे सौंदर्य तसेच आहे. तिच्या नेत्र कटाक्षांचे हे आगळे वैभव सांगताना, पूज्यपाद आचार्य श्री […]

कल्याणवृष्टिस्तव – ३

ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्तिब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः । एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति ॥ ३ ॥ आई जगदंबेचे वैभव सांगतांना आचार्य श्री येथे एका वेगळ्याच गोष्टीचा उपयोग करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात ते म्हणतात, ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्ति ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः- इथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ पाहण्यापेक्षा या सगळ्याचा एकत्रित भावार्थ […]

कल्याणवृष्टिस्तव – २

एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆत्वद्वन्दनॆषु सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ । सान्निद्ध्यमुद्यदरुणायुतसॊदरस्य त्वद्विग्रहस्य परया सुधयाप्लुतस्य ॥ २ ॥ अत्युत्तम साधकाची मानसिक अवस्था कशी असते? याचे नेमके वर्णन करताना आचार्यश्री या श्लोकात म्हणतात, एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆ- हे आई माझी एवढीच स्पृहा म्हणजे इच्छा आहे. कोणती ते सांगताना आचार्यश्री म्हणतात, त्वद्वन्दनॆषु – तुझ्या वंदन समयी, अर्थात नमस्कार करीत असताना, सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ- […]

कल्याणवृष्टिस्तव – १

कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिःलक्ष्मीस्वयंवरण मंगलदीपिकाभिः । सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम् ॥ १ ॥ आई जगदंबेच्या या नितांतसुंदर स्तोत्राचा पहिल्या चरणात आलेल्या कल्याणवृष्टी या पहिल्याच शब्दाच्या आधारे या संपूर्ण स्तोत्रालाच कल्याणवृष्टिस्तव या नावाने ओळखले जाते. आई जगदंबे की दृष्टी सकल कल्याणाचे अधिष्ठान आहे, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात, कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिः- आई सकल कल्याणाची वृष्टी करणारी तुझी ही […]

श्री भ्रमरांबाष्टकम् – ९

गायत्रीं गरुडध्वजां गगनगां गान्धर्वगानप्रियांगम्भीरां गजगामिनीं गिरिसुतां गन्धाक्षतालंकृताम् । गङ्गागौतमगर्गसंनुतपदां गां गौतमीं गोमतीं श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ९॥ एकच अक्षर किंवा शब्द वारंवार वापरण्याला साहित्यात अनुप्रास अलंकार असे म्हणतात. मागील श्लोकात आचार्यश्रींनी क चा उपयोग करून तर या श्लोकात ग चा उपयोग करून अनुप्रास साधला आहे. गायत्रीं – ज्याचे गायन केल्याने साधक तरुन जातो, त्या मंत्राला […]

1 25 26 27 28 29 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..