नवीन लेखन...

जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

श्री अन्नपूर्णाष्टकम् – ४

कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमा शङ्करीकौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी । मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥ कैलासाचलकन्दरालयकरी- अचल म्हणजे पर्वत. तो कधीही चल म्हणजे हालचाल करत नाही. कैलासाचल म्हणजे कैलास नावाचा पर्वत. कंदर म्हणजे गुहा. आलय म्हणजे निवास. अर्थात कैलास पर्वतावरील गुहांमध्ये जी निवास करते तिला कैलासाचलकन्दरालयकरी असे म्हणतात. गौरी- रंगाने गोरी असणारी. उमा- कालिका पुराणांत उमा शब्दाचा […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – ३

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरीचन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी । सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥ आई अन्नपूर्णेच्या कृपेने साधकाला कोणकोणते लाभ होतात, ते सांगण्याच्या हेतूने आचार्यश्री त्याच विशेषणांचा रूपात आईचे वर्णन करीत आहेत. योगानन्दकरी- आई जगदंबा साधकांना योगाचा आनंद प्रदान करते. कर्म, भक्ती, ज्ञान हे विविध योग शेवटी शरीरात राहूनच करावे लागतात. ते शरीर अन्नपूर्णेच्या कृपेने चालते. पर्यायाने […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – २

नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरीमुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी । काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥ नानारत्नविचित्रभूषणकरी- संस्कृतचे जे शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने वापरले जातात त्यातील एक शब्द म्हणजे विचित्र. मराठीत तो अजब , विक्षिप्त या अर्थाने वापरतात. मात्र संस्कृतमध्ये चित्र म्हणजे विविध रंगांनी आकर्षक. तर त्याला लावलेल्या विशेष या अर्थाच्या उपसर्गाने विचित्र म्हणजे विशेष आकर्षक. अत्यंत सुंदर. आई अन्नपूर्णा अशा अनेक […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – १

आई जगदंबेचे अत्यंत दिव्य स्वरूप म्हणजे श्री अन्नपूर्णा. भगवान महाकाल विश्वनाथ आपल्या क्षुधाशांतीसाठी आई जगदंबे च्या समोर भिक्षेकरी रूपात उभे राहतात. ती काशीपूर निवासिनी त्यांना भिक्षा देते. भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य महाराज या स्तोत्रात त्या अन्नपूर्णेचे स्तवन करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग २०

आई जगदंबेच्या सौंदर्याचे खरे वैभव हे आहे की ते सौंदर्य पाहणाऱ्याच्या मनात वासना नव्हे तर वात्सल्य जागृत करते. पाहणाऱ्याला तापवत नाही तर त्याचा ताप दूर करते.
या वैभवाला अधोरेखित करताना , इतर वेळी मानवी भावनांना चंचल करणाऱ्या समस्त गोष्टींचे वर्णन आचार्य करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग १९

खरे वैभव ते, जे इतरांना वैभवसंपन्न करते. खरे श्रेष्ठत्व ते जे इतरांना श्रेष्ठत्व प्रदान करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य ते जे इतरांना सौंदर्य प्रदान करते. आई जगदंबेच्या अशा सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री प्रथम तिच्या स्नानासाठी केलेल्या तयारीचे वर्णन करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग १८

आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात, […]

श्री आनंद लहरी – भाग १७

भगवान श्री शंकरांचे केवळ बाह्यरंगच नव्हे तर अंतरंग देखील आपल्यासाठी तितकेच भयावह आहे हे सांगत असताना आचार्य श्री म्हणतात…. […]

श्री आनंद लहरी – भाग १६

या श्लोकात आचार्यश्रींची प्रतिभा एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करते. आरंभीच्या तीन ओळीत भगवान शंकरांचे वर्णन आहे. हे वर्णन काहीसे नकारात्मक म्हणता येईल. मात्र त्या नकारात्मकतेच्या आधारे आचार्यश्री चौथ्या ओळीत आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग १५

आई जगदंबेच्या संसारातील प्रत्येकच गोष्ट अद्वितीय आहे. आईच्या या लोकोत्तर संसाराचे अधिक वर्णन करताना आचार्य म्हणतात…. […]

1 30 31 32 33 34 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..