भगवान श्री विष्णूंच्या वरच्या दोन हातात शंख आणि चक्र विराजमान असतात. स्वाभाविक सर्वप्रथम शंखाचे वर्णन केल्यानंतर वंदनाचा दुसरा मान आहे सुदर्शन चक्राचा. भगवान वैकुंठनाथांच्या त्या लोकविलक्षण अयुधाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]
भगवान श्रीवैकुंठनाथांच्या आळवणी साठी आचार्य श्री निर्माण केलेल्या विविध स्तोत्रां पैकी हे अत्यंत रमणीय स्तोत्र. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. भगवंताच्या चरण कमला पासून केशसंभारा पर्यंत प्रत्येक गोष्टीचे यात वर्णन केले आहे. […]
प्रस्तुत स्तोत्राचा समारोप करतांना आचार्यश्रींनी पारंपरिक पद्धतीची फलश्रुती मांडलेली नाही. याच नव्हे तर कोणत्याही स्तोत्राची जी अंतिम अपेक्षा आहे, थेट तिचेच प्रतिपादन करीत आचार्य श्री स्तोत्राचे समापन करतात. त्या परमेश्वराला प्रार्थना करतात, […]
अंतरंगी ज्या श्रीहरी तत्त्वाची साधकाला अनुभूती येते त्या तत्त्वाच्या अद्वितीय स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्रींनी केलेले आहे. कसे आहे हे तत्व? ते म्हणतात, […]
भगवंत प्राप्ती होईपर्यंत, परमानंद स्वरुपाची प्राप्ती होई पर्यंत मानवी जीवनाची वाटचाल कशा प्रकारची असावी? किंवा कोणत्या मार्गाने या पदाची प्राप्ती होते हे सांगताना प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री एक अत्यंत सुंदर उपमा दिलेली आहे. […]
शास्त्र सांगत आहे की अणूरेणूत सर्वत्र केवळ आणि केवळ परमात्माच भरलेला आहे. मात्र आपला अनुभव तसा नाही. आपल्याला परमात्म्याशिवाय अन्य सर्व जाणवत राहते. […]
विष्णू शब्दाचा अर्थच व्यापक असा आहे. या संपूर्ण चराचर ब्रम्हांडात, त्यातील अणूरेणूत तेच चैतन्य भरलेले आहे. असे सर्वत्र भरून सुद्धा ते दहा अंगुल शिल्लकच आहे. त्या तत्त्वाचा परम व्यापक अवस्थेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]
भगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हे शास्त्राने सुस्पष्टरीत्या सांगितले आहे. त्यागाच्या या रचनेत शब्दच सर्वस्व असा आहे. यात प्रथम सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यानंतर स्व चा देखील त्याग करावा लागतो. त्याच वेळी परमात्म तत्त्वाची प्राप्ती होते. हीच प्रक्रिया उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात, […]
प्राणापासून बुद्धी पर्यंत विचार करत असताना या प्रत्येक जागी जरी चैतन्याचा आविष्कार दिसत असला तरी तो प्रतिबिंब रूप आहे. ते माझे स्वरूप नाही. अशाप्रकारे निश्चिती झालेल्या त्या साधकाला आत्मतत्वाचे घ्याल अशा नकारात्मक स्वरुपात होणे उपयोगाचे नाही . […]
प्राणापासून बुद्धी पर्यंत सर्वत्र चालणारा चैतन्याचा विलास पाहिल्यानंतर त्या प्रत्येक जागी आत्मस्वरूपाचा विचार करून, चिंतन करणार्या साधकाला त्या त्या स्थानी असणाऱ्या मर्यादेची देखील जाणीव होते. […]