माझ्या ‘वानखेडे’च्या खास आठवणी
या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत होत आहे. […]