क्रिकेटपटू अजित वाडेकर
अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . […]