क्रिकेटपटू चेतन चौहान
चेतन चौहान यांनी पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले , आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी. […]
चेतन चौहान यांनी पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले , आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी. […]
बॉब टेलर हा डर्बीशायर टीमचा यष्टीरक्षक १९६१ ते १९८४ होता. डर्बीशायरचा जॉर्ज डॉकेस हा दुखापतीमुळे जखमी झाला तेव्हा पाहिले नाव यष्टीरक्षक म्हणून बॉब टेलर याचे आले. […]
पद्माकर शिवलकर म्हटले की अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही , ते केले तो प्रसंग त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला आणि तो प्रसंग होता रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘ मराठी माणसावरचा अन्याय ‘ ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते . […]
दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला. […]
एकनाथ सोलकर याना सर्व ‘ एक्की ‘ या टोपणनावाने हाक मारत. त्यांचे वडील हिंदू जिमखान्यावर माळी म्हणजे ग्राऊंड्समन होते. एकनाथ सोलकर लहान असताना त्या मैदानावर सामना असेल तर स्कॉरबोर्ड कधीकधी सांभाळायचे. त्यांचे बंधू अनंत सोलकर हे फर्स्ट क्लास क्रिकेट आणि रणजी सामने खेळलेले होते. […]
त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक जण स्थानिक क्रिकेट खेळत असत कारण त्या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या खेळात रुची होती. लेन हटन तेथील लिटीलमूर कौन्सिल शाळेच्या मैदानामध्ये खेळत असत. लेन हटन हे १९२१ ते १९३० पर्यंत त्या शाळेमध्ये होते. वयाच्या १२ व्या वर्षी ते पुडसें सेंट लॉरेन्स क्रिकेट क्लबमध्ये जाऊ लागले. […]
वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी हॅट्रिक घेऊन आणि ६५ धावा करून फर्स्ट क्लास क्रिकेटची सुरवात केली. १९३६ साली ते इंग्लंडच्या टूरवर गेले तेव्हा ते २१ वर्षाचे होते. मुश्ताक अली पहिला कसोटी सामना ५ जानेवारी १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळले. त्यावेळी त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ११२ धावा केल्या. सामना संपल्यावर लेखक सर नेव्हिल कार्डस यांनी लिहिले ,’ मुश्ताक अली यांची खेळी सर्व फटक्यांनी परिपूर्ण होती आणि त्या फटक्यात जे लखलखणारे तेज होते त्यावरून भारतीयांच्या डोळ्यातील तीक्ष्णता जाणवली . मुश्ताक यांनी आपल्या हातातल्या बॅटचे रूपांतर जादूगाराच्या कांडीत केले !’ […]
शाळेत असताना जॉन वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळत असे. त्यांचे कोच होते माजी क्रिकेटपटू सी. एस. आर. बॉसवेल . बॉसवेल स्वतः ३० फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळलेले होते. जॉन एड्रीच क्रिकेटमध्ये कट् , कव्हर ड्राइव्ह असे फटके मारण्यामध्ये तरबेज होते. १९५६ आणि १९५७ मध्ये ते फर्स्ट क्लास सामने कंम्बाईन्ड सर्व्हिसेस साठी खेळले. ते ‘ सरे ‘ साठी पहिला फर्स्ट क्लास सामना १९५८ च्या सेशनमध्ये खेळले. त्या वर्षी त्यांनी ५२.९१ च्या सरासरीने १,७९९ धावा केल्या.जॉन एड्रीच यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना ६ जून १९६३ रोजी इंग्लडविरुद्ध खेळला . […]
त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट हे दोन महायुद्धाच्या मधल्या कालखंडात खेळले. त्या काळात क्रिकेटच्या खेळाडूंना खूप प्रसिद्धी मिळत असे. ते जेव्हा अपील करत असत तेव्हा त्यांचा आवाज हा मोठा होता , अपील करताना ते मोठयाने विशिष्ट शब्द म्हणजे ‘ ऑझ दॅट ‘ हे शब्द बोलत . ह्याचा खरा उच्चार ‘ हाउज दॅट ‘ असे . पुढे तो शब्द खूप पॉप्युलर झाला. त्यामुळे ते अनेकांच्या लक्षात रहात असत. […]
चंद्रशेखर यांना संगीताची खूप आवड असून के. एल . सैगल हा त्यांचा आवडता गायक आहे. ते म्हणतात सैगल यांच्या आवाजातून मला स्फूर्ती मिळाली. बी. एस. चंद्रशेखर यांना भारत सरकारने पदमभूषण अवॉर्ड दिले , अर्जुन अवॉर्ड दिले तर विझडेन क्रिकेटीअर्स ऑफ १९७२ चा सन्मान त्यांना मिळाला. तर भारतीय क्रिकेट क्रिकेटीअर १९७२ ह्या किताबाने ते मध्ये सन्मानित झाले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions