नोव्हेंबर १६ : संथ टॅवेर आणि गावसकरचा विश्वविक्रम
ज्येफ कुकने क्रिस टॅवेरच्या साथीत इंग्लंडचा दुसरा डाव सुरू केला. संघाच्या दहा धावांवर कुक बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या डावाचे ‘वय’ ३२ मिनिटे एवढे होते. एवढ्या वेळात टॅवेरने खाते उघडले नव्हते. आणखी ३१ मिनिटांनंतर अखेर त्याने पहिली धाव घेतली. या डावातील ९० धावांच्या खेळीदरम्यान सुनील गावसकरने इंग्लंडच्या ज्येफ बॉयकॉटचा ८,११४ कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होण्याची ही पहिलीच वेळ होती.
[…]