नवीन लेखन...

नोव्हेंबर ०७ – दुसर्‍याच सामन्यात त्रिशतक आणि कांगारूंवर पहिला मालिकाविजय

१९९६ : वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, आपल्या दुसर्‍याच प्रथमश्रेणी सामन्यात वसिम जाफरने सौराष्ट्राविरुद्ध राजकोटमध्ये नाबाद ३१४ धावा काढल्या.

१९७९ : मालिकेतील सहावा सामना जिंकून भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. […]

नोव्हेंबर ०८ – ३३१ ची भिडूगिरी आणि उलटा झाडू, सुटला चषक

१९९९ : तीनच दिवसांपूर्वी राजकोटमध्ये झालेला सामना न्यूझीलंडने त्यांची सर्वोच्च धावसंख्या (३४९) उभारून जिंकल होता.

१९८७ : माईक गॅटिंगने झाडूचा उलटा फटका मारण्याचा भयावह (आणि अयशस्वी) प्रयत्न केला तो हा दिवस. […]

नोव्हेंबर ०९ – उट्टे आणि खिलाडू हॅडली

१९८६ : पहिल्या सामन्यात ५३ धावांवर सर्वबादची नामुष्की ओढवलेल्या (पहा : २८ ऑक्टोबर, अनपेक्षित हार) वेस्ट इंडीज संघाने दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला.

१९८५ : अतुलनीय रिचर्ड हॅडलीचा एक सनसनाटी दिवस. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ५२ धावांमध्ये ९ तर एकूण १२३ धावांमध्ये १५ फलंदाजांना तंबूची वाट दाखवीत हॅडलीने ऑस्ट्रेलियाची वाट लावली. […]

ऑक्टोबर १९ – भुकेला पॉनी आणि मार्कची मृदुता

१९०० : धावांची खूप जास्त भूक असणार्‍या बिल पॉन्सफोर्डचा जन्म.१९९८ : पेशावरमधील सामना अनिर्णित राहिल्याने १-० अशी आघाडी कायम राखत १९६०नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्याच्या आशा कांगारूंनी जिवंत ठेवल्या. […]

ऑक्टोबर २० – सीमाप्रेमी सरदार आणि नजफगढचा नवाब

१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्‍या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.

१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला. […]

ऑक्टोबर २१ – गोइंग, गोइंग, गॉन आणि उमदा उल्येट

१९४० : जेफ्री बॉयकॉटचा जन्म. त्याची प्रतिभा आणि तंत्र याबाबत कुठेही दुमत नाही पण त्याच्या अप्पलपोटेपणामुळे क्रिकेटविश्वात त्याच्याबद्दल विविध मते आढळतात.

१८५१ : यॉर्कशायरच्या जॉर्ज उल्येट या उमद्या अष्टपैलू खेळाडूचा जन्म. त्याची २४ ही त्या काळातील सरासरी तो काळ पाहता आजमितीच्या ४८ पेक्षा चांगली आहे. […]

ऑक्टोबर २२ – मॅकोची मजा आणि ब्रेशॉचे ‘दस्कट’

१९८३ : मॅकोच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कानपूरमध्ये भारताविरुद्ध माल्कम मार्शलने ९२ धावा काढून सर्वोच्च कामगिरी तर नोंदविलीच पण पहिल्याच हप्त्यात गोलंदाजी केली ८-५-९-४.

१९६७ : इअन ब्रेशॉ (ब्रॅडशॉ नाही) या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने ‘दस्कटाचा’ मान मिळविला- व्हिक्टोरियाचे दहाच्या दहा गडी बाद केले. […]

ऑक्टोबर २३ – बेरकी जार्डिन आणि डॉक्टर गेले…

१९०० : शरीरवेधी गोलंदाजीच्या आविष्कारकर्त्याचा जन्म. १९१५ : क्रिकेटमधील सर्वात विख्यात दाढीचे मालक असलेल्या डॉक्टर विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांचे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]

ऑक्टोबर २४ – रजाचा छोटासा विक्रम आणि दोन अंकी बंधू-पुराण

१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्‍या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते. […]

ऑक्टोबर २५ – शहारविणारे शतक आणि झहीद-जावेद

१९८२ : सर्वात कमी चेंडूंमध्ये झळकाविले गेलेले प्रथमश्रेणीतील निर्विवाद (आणि सर्वमान्य) शतक. व्हिक्टोरियाविरुद्ध अडलेडमध्ये डेविड हूक्सने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये शतक काढले. […]

1 12 13 14 15 16 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..