ऑक्टोबर ०४ – ‘रंगीत’ बेसिल आणि बूम बूम १००
पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
[…]
पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
[…]
भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.
[…]
२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.
२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.
[…]
२६ सप्टेंबर १९३१ रोजी तेव्हाच्या बॉम्बेत विजय लक्ष्मण मांजरेकरांचा जन्म झाला. वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे जवळजवळ नसण्याच्या काळात त्यांनी वेगवान गोलंदाजी खेळण्याचे दंडक घालून देण्याजोगी फलंदाजी केली. २६ सप्टेंबर १९४३ रोजी इअन मायकल चॅपेलचा जन्म झाला. ‘चॅपेली’ या नावाने तो ‘लाडका’ आहे. अनेक लेखक-विश्लेषकांच्या मते इअन चॅपेल हा क्रिकेटच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे.
[…]
इंडीयन प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीने गाजविणार्या ब्रेन्डन बॅरी मॅक्कलमचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी ओटागोत झाला. अत्यंत स्फोटक फळकूटवीर असण्याबरोबरच तो एक चपळ यष्टीरक्षकही आहे.
ब्रेन्डन मॅक्कलमच्या जन्मानंतर बरोबर एका वर्षाने कॅरिबिअन बेटांवरील जमैकातील किंग्स्टन शहरातील सबिना पार्क मैदानावर एडी हेमिंग्जने एकाच प्रथमश्रेणी डावात दाहीच्या दाही गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
[…]
तोवरच्या १,०५२ कसोट्यांच्या इतिहासातील केवळ दुसरी बरोबरीत संपलेली कसोटी २२ सप्टेंबर १९८६ रोजी ‘संपली’. प्रतिस्पर्धी होते भारत-ऑस्ट्रेलिया.
[…]
राहुल द्रविड ही भारताची कसोट्यांमधील पहिली भिंत नाही. त्याच्यापूर्वीही ‘द ग्रेट वॉल’ या नावाने एक भारतीय फलंदाज ओळखला जाई. २३ सप्टेंबर १९५२ रोजी अंशुमन गायकवाडचा (मुंबईत) जन्म झाला. अंशुमनच्या वडलांनी – दत्ताजीराव गायकवाड – १९५९ साली इंग्लंड दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
[…]
२१ सप्टेंबर ही अनेक चांगल्या कॅरिबिअन खेळाडूंच्या जन्माची तारीख आहे.
[…]
गोलंदाजाने एका डावात पाच बळी घेणे किंवा फलंदाजाने शतक करणे यापेक्षा फार जास्त दुर्मिळ आणि अतिशय कमी वारंवारता असलेली घटना म्हणजे एका क्षेत्ररक्षकाने एका डावात ५ गडी बाद करणे. यष्टीरक्षकांच्या बाबतीत हे तसे कमी वेळाच पण ‘बर्याचदा’ घडू शकते. निव्वळ क्षेत्ररक्षकाकडून हे घडणे म्हणूनच आश्चर्यजनक ठरते.
[…]
लीड्स्वर ऑस्ट्रेलियाचे सात गडी त्याने एकट्याने केवळ ५१ धावा देऊन गारद केले. त्यानंतर २० वर्षे विश्वचषकातील कुठल्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी होती. १८ सप्टेंबर १९९७ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरू झालेला झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड हा कसोटी सामना ‘भाऊगर्दी’साठी प्रसिद्ध आहे. झिम्बाब्वेच्या संघात सख्ख्या भावाभावांच्या तीन जोड्या होत्या.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions