नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

क्रिकेटपटू विनू मंकड

प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले. […]

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिची बेनॉ

रिची बेनॉ हे स्पिनर आणि गुगली टाकत होते परंतु ते चेंडूला फ्लाइट द्यायचे आणि त्याचबरोबर योग्य दिशा देत असत त्यामुळे समोरचा फलंदाज सतत दडपणाखाली असायचा. ते आजच्या शेर्न वॉर्न अँशले गिल्स प्रमाणे अराउंड द विकेट टाकायचे . त्याचपप्रमाणे ते त्या काळामध्ये अत्यंत प्रभावी क्लोज फिल्डर होते. […]

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू बापू नाडकर्णी

बापू नाडकर्णी हे खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर स्पोर्स्टमन होते , ऑल राऊंडर होते. ते कॉलेजमधून स्टेट लेव्हलला टेनिस खेळले . क्रिकेट खेळतच होते. नॅशनल लेव्हलला बॅडमिंटन खेळले , खो-खो , टेबल टेनिस हे सर्व खेळ खेळले . इतकेच नव्हे ते अभ्यासामध्येही ग्रेट होते . […]

क्रिकेटपटू महाराज रणजितसिंहजी

त्यांनी 15 कसोटी सामन्यात 44.95 च्या सरासरीने 989 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 2 शतके आणि 6 अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती 175 धावा तसेच त्यांनी 13 झेलही घेतले. त्यांनी 307 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 24,692 धावा केल्या त्या 56.37 च्या सरासरीने त्यामध्ये त्यांनी 72 शतके आणि 109 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 285 धावा तसेच त्यांनी 133 विकेट्सही घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 53 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. तसेच 233 झेलही पकडले. त्यांच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. तो म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्यांनी एक सीझनमध्ये 3000 च्या वर धावा केल्या , त्यांनी 63.18 च्या सरासरीने 3,159 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी आठ शतके केली. […]

क्रिकेटपटू अजित वाडेकर

अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . […]

राष्ट्रीय खेळ दिवस

राष्ट्रीय खेळ दिवस हा सगळ्या देशांमध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो. पण ह्याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो? ह्याच तारखेला हा दिवस साजरा करण्यामागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्म. […]

ज्ञात अज्ञात पंढरपूर २ – समस्त कलगीवाले थोरली तालिम

पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे समस्त कलगीवाले थोरली तालिम हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा. पंढरीत गुणवंत मल्लाची खाण होती, आहे त्यांना घडविण्याचे कार्य या तालिमीने केले. […]

जागतिक बुद्धिबळदिन

बुद्धिबळाला खेळ म्हणून समाजात प्रतिष्ठेचे स्थान आहे. २० जुलै  १९२४ साली फिडे या इंटरनॅशनल बुद्धिबळ फेडरेशन ची स्थापना झाली. या मुळे २० जुलै  हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून  साजरा केला जातो. […]

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन

आज ४ एप्रिल म्हणजेच  महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिवस. आपल्या मुलांना  बुद्धिबळ हा खेळ शिकवणे आणि त्या खेळाची गोडी  मुलांमध्ये निर्माण करणे  हि गरज लक्षात घेता “महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन” साजरा केला जातोय. बुद्धिबळ हा घरी बसून खेळता येण्याजोगा बैठा खेळ. बुद्धिबळाने  खेळाडूंना एके जागी स्थिर व एकाग्र करण्याची ताकद जणू काही सिद्ध केली आहे. सद्य परिस्थितीमधे तीच ताकद अत्यावश्यक वाटते. […]

सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील  `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी.  […]

1 9 10 11 12 13 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..