नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

वानखेडे स्टेडियमची गोष्ट

…… महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला अपमानजनक उद्गार त्यांनी काढणार्‍या विजय मर्चंट यांचा सगळ्याच आमदारांना राग आला होता. पण काही पर्याय नव्हता. झालेला अपमान गिळून सगळे तिथून निघून आले. काही दिवसात ही झालेली गोष्ट बाकीचे विसरून गेले पण शेषराव वानखेडे हा अपमान विसरले नव्हते. मात्र ते राग मनात ठेवून बसले नाहीत. त्यांनी आता एक स्टेडियम उभा करायचेच अशी खुणगाठ बांधली. […]

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम. पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे. […]

जिद्दी एव्हरेस्टवीर – आनंद बनसोडे

हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते. […]

झापडं काढा सुनिल, सचिन

सुनील आणि सचिन, सभ्य गृहस्थहो, तुमची झापडं काढा, जागे व्हा, जनप्रक्षोभ ज़रा समजून घ्या , आणि पाकिस्तानशी क्रीडासंबंध तोडायला अनुकूलता दाखवा. नाहींतरी, सरकार, ‘काय करावें’ ती कृती तुम्हांला विचारून थोडीच अमलात आणणार आहे ? तुमच्या चुकीच्या स्टँडबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हांला नांवें ठेवतच आहेत. तरी , जनक्षोभ तुमच्या विरुद्ध जाण्यांआधी तुमचा स्टँड बदला, लवकर बदला, नाहींतर उशीर झालेला असेल . […]

जानेवारी १४ : प्रो. दि. ब. देबधरांचे पुण्यस्मरण

१४ जानेवारी १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटमधील पहिलेवहिले प्रथमश्रेणी शतक देवधरांनी काढले होते, तेही आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध. हे पहिले भारतीय कसोटी शतकही ठरले असते पण तोवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळच अस्तित्वात नसल्याने हा मान त्यांच्या नावे लागू शकला नाही. महाराष्ट्राने १९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला तेव्हा देवधरच कर्णधार होते. सातत्याने मोठमोठ्या सांघिक धावा करणार्‍या महाराष्ट्र संघाने आणि नभोवाणीवरून सामन्यांची वर्णने करणार्‍या बॉबी तल्यारखानांनी भारतात रणजी स्पर्धा लोकप्रिय केली असे खुद्द देवधरांनीच आपल्या ‘शतकाकडे’ या आत्मचरित्रात म्हटले आहे.
[…]

विराट कोहली यास….

एका अज्ञाात लेखकाने विराट कोहलीला लिहिलेले हे खरमरीत पत्र. मराठीत असल्यामुळे कोहलीपर्यंत पोहोचणार नाही.. पण भाषांतर करुन कुणीतरी त्याच्यापर्यंत पाठवायलाच हवे. कळून दया त्याला त्याची लायकी […]

भारताचा जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर

भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच “०७ मार्च १९८७”रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या. अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत […]

महाराष्ट्राच्या अनेक “गीता”बबिता” संधीच्या प्रतीक्षेत

“दंगल” चित्रपटानिमित्त हा खास लेख आजच “दंगल” हा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती पै.कु. गीता फोगट च्या जीवनावर सत्यकथा असलेला दंगल चित्रपट रिलीज झाला.  गीता चा सर्व जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.प्रत्येक पालकांनी पहावा असा हा चित्रपट आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रात पण अनेक गीता,बबिता संघर्षमय जीवन जगताना दिसून येतात. बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातून आलेली पै.कु.सोनाली तोडकर हिने […]

सर डॉन ब्रॅडमन यांचा सार्वकालिक सर्वोत्तम संघ

२५ फेब्रुवारी २००१ रोजी सर डॉन ब्रॅडमन यांचे निधन झाले. त्याआधी सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचा सार्वकालिक सर्वोत्तम संघ निवडला होता. इथेही त्यांचे टाइमिंग जबरदस्त होते. ‘मुलाखती आणि प्रश्न किंवा स्पष्टीकरणांसाठी कुणी आपल्याकडे येऊ नये’ म्हणून आपल्या आयुष्याचा (हा) डाव संपल्यावरच हा संघ जाहीर करावा अशी त्यांची सूचना होती! आताच्या पिढीतील खेळाडूंपैकी केवळ सचिन तेंडुलकरचा समावेश त्यांनी […]

1 10 11 12 13 14 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..