…महाराष्ट्राचे कर्णधार राजा गोखले आणि सामनाधिकार्यांची ठाकूरसाहेबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दोन षटकांचा तरी खेळ व्हावा आणि भाऊसाहेबांना ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी दिली जावी अशी विनंतीही करून पाहिली, पण व्यर्थ…ठाकूरसाब संघाला घेऊन मैदानाबाहेर गेले आणि त्यांनी थेट स्टेशन गाठले ! […]
भारताची अव्वल बॅडमिटनपटू साईना नेहवाल हिने ‘हाँगकाँग सुपर सिरीज’ स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम केला. चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवणे अशक्य असल्याचा समज खोटा ठरवताना तिने चीनच्याच शिझियान वँग या खेळाडूवर मात केली. या विजयाद्वारे तिने चिनी खेळाडूंच्या योजना अचूक ओळखून त्यावर आपली बिनतोड योजना अंमलात आणली. या स्पर्धेत तिने चिनी खेळाडूंचा ‘कोड क्रॅक’ केल्याचे बोलले जाते. […]