१० डिसेंबर २००५ रोजी सचिन तेंडुलकरचे पस्तिसावे कसोटी शतक आले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर श्रीलंकेविरुद्ध. अकरा महिन्यांपूर्वी त्याने सुनील गावसकरच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली होती. त्यानंतरचे त्याचे शतक येण्यास अंमळ उशीरच झाला हे खरे पण या काळात तो केवळ पाचच कसोट्या खेळला हेही लक्षणीय.
सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील काही लक्षणीय गोष्टींवर एक नजर… […]
एक वर्षापूर्वी या तारखेला वीरेंदर सेहवाग मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर सात-कमी-३०० धावांवर बाद झाला आणि तीन कसोटी त्रिशतके काढणारा पहिला फलंदाज होण्याचा त्याचा विक्रम हुकला. […]
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची भरघोस कमाई केल्यानंतर भारतीय खेळाडूंचे आशियाई स्पर्धेतील अपयश अधिकच उठून दिसत होते. त्यात सेनादलाच्या बजरंगलाल ताखर या जवानाने रोईंगच्या सिंगल्स स्कल प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाची प्रतिष्ठा राखली. राजस्थानमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावातून आलेल्या बजरंगलालने अपुर्या आणि दर्जाहीन सुविधांसह खडतर परिश्रम करून हे पदक मिळवले. […]