अखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच ! समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला. […]
२१ वर्षांच्या खंडानंतर दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय क्रिकेट संघ अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या दिवशी खेळता झाला. बेसिल डी-ऑलिव्हेरा प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने वाळीत टाकले होते. आफ्रिकी राज्यकर्त्यांच्या वर्णद्वेषी धोरणाचा हा परिपाक होता. दक्षिण आफ्रिकेच्या या पुनरागमनानंतर ९ वर्षांनी बांग्लादेश हा भारताचा शेजारी आंतरराष्ट्रीय कसोटीविश्वात प्रवेश करता झाला. […]
न्यूझीलंडच्या केन रुदरफोर्डचा जन्म. केनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात वाईट झाली. पहिल्या महायुद्धादरम्यान कैदी म्हणून पकडल्या गेलेल्या एकमेव कसोटीवीराचा जन्म. […]
१८९५ : भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म. कर्नल कोट्टरी कंकरिया नायडू ड्राईव्ह करण्यात अतिशय पटाईत फलंदाज आणि उपयुक्त मंदगती गोलंदाज होते. १९८७ : विश्वचषक स्पर्धेतील पहिला त्रिक्रम. आपल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर केन रुदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्डला बाद करीत भारताच्या चेतन शर्माने त्रिक्रम साधला. […]
१९७४ : खूप खूप खास फलंदाजाचा जन्म. १३-१४ मार्च २००१ या दोन दिवसांत वेरिगुप्पा वेंकट साई लक्ष्मणचे आयुष्य पार बदलून गेले.
१९७० : शेर्विन कॅम्प्बेलचा जन्म. वेस्ट इंडीज क्रिकेट सलामीच्या भरवशाच्या जोडीच्या शोधात असूनही शेर्विनला संधी का मिळाली नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे. […]