१९८३ : मॅकोच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कानपूरमध्ये भारताविरुद्ध माल्कम मार्शलने ९२ धावा काढून सर्वोच्च कामगिरी तर नोंदविलीच पण पहिल्याच हप्त्यात गोलंदाजी केली ८-५-९-४.
१९६७ : इअन ब्रेशॉ (ब्रॅडशॉ नाही) या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने ‘दस्कटाचा’ मान मिळविला- व्हिक्टोरियाचे दहाच्या दहा गडी बाद केले. […]
१९०० : शरीरवेधी गोलंदाजीच्या आविष्कारकर्त्याचा जन्म. १९१५ : क्रिकेटमधील सर्वात विख्यात दाढीचे मालक असलेल्या डॉक्टर विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांचे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]
एका विजय दहियाचा अपवाद वगळता नावात ‘विजय’ असलेल्या इतर सर्व जणांनी कसोट्यांमध्ये भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर आणि अगदी आत्त्ताच्या मुरली विजयची सुरुवातही आश्वासक आहे. अवघ्या दुसर्याच दिवशी संपलेली एक कसोटी १२ ऑक्टोबर २००२ रोजी शारजात सुरू झाली. […]
’सर्पट्या’ चेंडूच्या (गुगली) शोधाचे श्रेय ज्याला दिले जाते त्या बर्नार्ड जेम्स टिन्डल बोसांकेचा जन्म १३ ऑक्टोबर १८७७ रोजी मिडलसेक्समध्ये झाला (इंग्लंड). […]
१४ ऑक्टोबर १९६८ रोजी रशिद लतिफ या पाकिस्तानी कर्णधाराचा आणि यष्टीरक्षकाचा जन्म झाला. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणार्या निकालनिश्चिती प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार मान्य करणार्या थोडक्या खेळाडूंमध्ये रशीद लतीफ होता. […]
१५ ऑक्टोबर १९८९ रोजी दिल्लीत नेहरू चषकाचा सामना श्रीलंका आणि इंग्लंडदरम्यान झाला. अलेक स्टेवर्ट आणि अँगस फ्रेजर यांनी आपापली पदार्पणे साजरी केली. ग्रॅहम गूचने अनपेक्षितरीत्या या सामन्यात गोलंदाजीत यश मिळविले. […]
१६ ऑक्टोबर १९५२ : पाकिस्तान कसोटी खेळणारे सातवे राष्ट्र बनले. पूर्वीच्या संघांच्या इतिहासाप्रमाणेच त्यांचा सुरुवातीला चोळामोळा झाला. लाला अमरनाथ या सामन्यात भारताचे कर्णधार होते. त्यांचा जन्म ‘आताच्या’ पाकिस्तानात झालेला होता. […]
१९७० : चेंडूला फार मोठी फिरक न देता लेगस्पिनरने ६०० बळी मिळविणे आहे खरे पण या दिवशी जन्मलेल्या अनिल कुंबळेने ते खरे करून दाखविलेले आहे. केवळ दिशेवरील नियंत्रण आणि उसळीमुळे जम्बो खूप चांगला गोलंदाज ठरला. […]