नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

ऑक्टोबर ०२ – पोंद्या वॉर्नर आणि बुधी कुंदरन

ग्रॅन्ड ओल्ड मॅन ऑफ इंग्लिश क्रिकेट किंवा ‘पोंद्या’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या सर पेलहॅम फ्रान्सिस वॉर्नरचा जन्म २ ऑक्टोबर १८७३ रोजी त्रिनिदादमध्ये झाला. २ ऑक्टोबर १९३९ रोजी कर्नाटकातील मंगलोरजवळील मल्कीत बुधिसागर कृष्णाप्पा कुंदरन यांचा जन्म झाला.
[…]

ऑक्टोबर ०३ – रे लिंड्वॉल – एक झंझावात

३ ऑक्टोबर १९२१ रोजी रेमंड रसेल लिंड्वॉलचा जन्म झाला. संक्षिप्तपणे रे लिंड्वॉल म्हणून ओळखला जाणारा रेमंड हा सार्वकालिक द्रुतगती गोलंदाजांच्या ताफ्यातील सर्वोत्तमांपैकी एक म्हणून सार्थपणे क्रिकेटिहासात आपली जागा कमावून आहे.
[…]

ऑक्टोबर ०४ – ‘रंगीत’ बेसिल आणि बूम बूम १००

पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्‍या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
[…]

आणखी किती लाज सोडायची?

राष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीतूनच भारताच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागल्याने क्रीडा क्षेत्रात भारताची प्रचंड घसरण होवून बसलीय हे कटू सत्य पचविणं आता भाग पडलं आहे.
[…]

सप्टेंबर २४ – जिमी अमरनाथ आणि विसविशीत विश्वविजय

भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.
[…]

सप्टेंबर २५ – ‘हॅन्सी’ क्रोनिए आणि मॅडम क्लेअर

२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्‍या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.

२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्‍या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.
[…]

सप्टेंबर २६ – विजय मांजरेकर आणि इअन ‘चॅपेली’

२६ सप्टेंबर १९३१ रोजी तेव्हाच्या बॉम्बेत विजय लक्ष्मण मांजरेकरांचा जन्म झाला. वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे जवळजवळ नसण्याच्या काळात त्यांनी वेगवान गोलंदाजी खेळण्याचे दंडक घालून देण्याजोगी फलंदाजी केली. २६ सप्टेंबर १९४३ रोजी इअन मायकल चॅपेलचा जन्म झाला. ‘चॅपेली’ या नावाने तो ‘लाडका’ आहे. अनेक लेखक-विश्लेषकांच्या मते इअन चॅपेल हा क्रिकेटच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे.
[…]

सप्टेंबर २७ – ‘झडप्या’ ब्रेन्डन मॅक्कलम आणि हेमिंग्जचे ‘दाही’ बळी

इंडीयन प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीने गाजविणार्‍या ब्रेन्डन बॅरी मॅक्कलमचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी ओटागोत झाला. अत्यंत स्फोटक फळकूटवीर असण्याबरोबरच तो एक चपळ यष्टीरक्षकही आहे.

ब्रेन्डन मॅक्कलमच्या जन्मानंतर बरोबर एका वर्षाने कॅरिबिअन बेटांवरील जमैकातील किंग्स्टन शहरातील सबिना पार्क मैदानावर एडी हेमिंग्जने एकाच प्रथमश्रेणी डावात दाहीच्या दाही गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
[…]

1 28 29 30 31 32 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..