इंडीयन प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीने गाजविणार्या ब्रेन्डन बॅरी मॅक्कलमचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी ओटागोत झाला. अत्यंत स्फोटक फळकूटवीर असण्याबरोबरच तो एक चपळ यष्टीरक्षकही आहे.
ब्रेन्डन मॅक्कलमच्या जन्मानंतर बरोबर एका वर्षाने कॅरिबिअन बेटांवरील जमैकातील किंग्स्टन शहरातील सबिना पार्क मैदानावर एडी हेमिंग्जने एकाच प्रथमश्रेणी डावात दाहीच्या दाही गडी बाद करण्याचा पराक्रम केला. […]
राहुल द्रविड ही भारताची कसोट्यांमधील पहिली भिंत नाही. त्याच्यापूर्वीही ‘द ग्रेट वॉल’ या नावाने एक भारतीय फलंदाज ओळखला जाई. २३ सप्टेंबर १९५२ रोजी अंशुमन गायकवाडचा (मुंबईत) जन्म झाला. अंशुमनच्या वडलांनी – दत्ताजीराव गायकवाड – १९५९ साली इंग्लंड दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. […]
गोलंदाजाने एका डावात पाच बळी घेणे किंवा फलंदाजाने शतक करणे यापेक्षा फार जास्त दुर्मिळ आणि अतिशय कमी वारंवारता असलेली घटना म्हणजे एका क्षेत्ररक्षकाने एका डावात ५ गडी बाद करणे. यष्टीरक्षकांच्या बाबतीत हे तसे कमी वेळाच पण ‘बर्याचदा’ घडू शकते. निव्वळ क्षेत्ररक्षकाकडून हे घडणे म्हणूनच आश्चर्यजनक ठरते. […]
लीड्स्वर ऑस्ट्रेलियाचे सात गडी त्याने एकट्याने केवळ ५१ धावा देऊन गारद केले. त्यानंतर २० वर्षे विश्वचषकातील कुठल्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी होती. १८ सप्टेंबर १९९७ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरू झालेला झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड हा कसोटी सामना ‘भाऊगर्दी’साठी प्रसिद्ध आहे. झिम्बाब्वेच्या संघात सख्ख्या भावाभावांच्या तीन जोड्या होत्या. […]
२० सप्टेंबर १९८२ या दिवशी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील पहिला त्रिक्रम घडला. अधिकृत एदिसांच्या यादीतील हा १५८ वा सामना होता. स्थळ : नियाझ स्टेडीयम, हैदराबाद, सिंध (पाकिस्तान). कांगारू कर्णधार किम ह्युजेसने नाणेकौल जिंकून यजमानांना आमंत्रण दिले. निर्धारित ४० षटकांअखेर पाकिस्तानने ६ बाद २२९ धावा केल्या. […]
१९६९ मधील पुनर्रचनेनुसार इंग्लिश प्रथम श्रेणी हंगामातील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली. तेव्हापासून एकाच हंगामात १,००० धावा आणि १०० बळी ही कामगिरी केवळ दोघांनाच साधली आहे.
एकदिवसीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे अंतिम सामन्यातील विजय आताशा खूपच दुर्मिळ झाले आहेत. १७ सप्टेंबर १९९४ हा दिवस मात्र त्याला अपवाद मानावा लागेल. […]
१५ सप्टेंबर १९५५ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात अब्दुल कादिर खानचा जन्म झाला. पदार्पणावेळी दाखविलेल्या धडाक्यातच बराच काळ खेळत राहिलेला एक श्रेष्ठ लेगस्पिनर म्हणून कादिरची सार्थ ओळख क्रिकेटविश्वाला आहे. १५ सप्टेंबर १९७१ रोजी न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्चमध्ये जन्माला आलेल्या एका बालकाच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान द्विशतक आहे. नॅथन जॉन असल त्याचं नाव. […]