नुसत्याच घोषणा
सरकार केंद्रातले असो की राज्यातले घोषणा करून लोकांना लॉलीपॉप देण्याचे निव्वळ नाटक करीत असते. […]
सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन
सरकार केंद्रातले असो की राज्यातले घोषणा करून लोकांना लॉलीपॉप देण्याचे निव्वळ नाटक करीत असते. […]
विश्वास बसणे अवघड आहे पण तो वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करीत असताना त्याने घेतलेले बळी एका सामन्यामागे दहा भरतात ! १८५० मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात जॉन विज्डेनने प्रतिस्पर्धी संघातील दाहीच्या दाही फलंदाजांचे एकाच डावात त्रिफळे उडविलेले होते ! प्रथमश्रेणी सामन्यात एका डावात दहा बळी घेणारे गोलंदाज त्यानंतरही झाले पण विज्डेनच्या या अचाट पराक्रमाची बरोबरी कुणीही करू शकलेले नाही.
[…]
या मालिकेत त्याने 16 झेल लपकले आणि फलंदाजांच्या सरासरीमध्ये त्याच्याहून सरस फक्त एकच जण होता ! नियमित (मान्यताप्राप्त) फलंदाज अपयशी झाल्यानंतर हमखास ‘चालणारा’ फलंदाज म्हणून किरणची क्षमता या पहिल्या मालिकेतच दिसून आली. त्यानंतर सुमारे सात वर्षे तो भारताचा नियमित यष्टीरक्षक राहिला.
[…]
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना […]
…आपला नेहमीचा गोलंदाज सिडनी बार्न्सला सोडून जॉनीने त्या कसोटीत गोलंदाजीची सुरुवात केली होती. सिडही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. कप्तानाला भर मैदानावर तो कचाकचा बोलला आणि गोलंदाजी करण्यासाठी जॉनीने पुन्हा चेंडू हातात घेतला नाही. सिडच्या धैर्याचे केवळ कौतुकच केले जाऊ शकेल – 1908च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (लंडन) जॉनीने अंतिम फेरीत स्नोवी बेकर या ऑस्ट्रेलियाई खेळाडूला पराभूत करून मध्यम वजनगटातील मुष्टियुद्धाचे विजेतेपद मिळविले होते !
[…]
…सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद. […]
… एकाच खेळाडूने दोन वेगवेगळ्या संघांकडून कसोट्या खेळणे ही अत्यंत दुर्मिळ (आणि आता जवळपास अस्तंगत झालेली) कामगिरी ज्या काही थोड्यांच्या नावावर आहे त्यापैकी इलाही एक आहेत. भारतात असताना बडोद्याकडून ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.
[…]
…नॉटिमगहमशायरच्या गॅरी सोबर्सने त्याच्या एका षटकातील समग्र कंदुके सीमारेषेवरोनिया दिगंतात धाडिली. पंचम कंदुक रॉजर डेविस नामक क्रीडकाच्या करांमध्ये विसावला खरा पण तोलभंगाने कंदुकासह तो मर्यादारेखा स्पर्शिता झाला.
[…]
पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?) […]
…60,000 प्रथमश्रेणी धावा जमविणारा हॉब्ज हा एकमेव फलंदाज आहे – मोठे डाव खेळलेला नसूनही. त्याला डॉन ब्रॅडमनसारखी मोठ्या डावांची ‘सवय’ असती तर हा आकडा किती फुगला असता याची कल्पनाही करवत नाही.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions