नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

भारतीयांचा पहिला ब्रिटिश-विजय आणि सोबर्सचे अंतिम शतक

… धावफलकात त्याची नोंद नाबाद अशी आढळते. विज्डेनच्या वार्षिकांकात तो ‘पोटदुखी’मुळे निवृत्त झाला अशी माहिती मिळते. खरी बात मात्र औरच आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो 31 धावांवर नाबाद होता आणि अख्खी रात्र त्याने पोर्ट आणि ब्रॅन्डी पिण्यात घालवली होती. त्याच्या चित्तवृत्ती दुसर्‍या दिवशी फलंदाजीस उतरताना मद्यमय झालेल्या होत्या आणि आपण मैदानावरच उलट्या करू अशी शक्यता त्याला ‘त्या’ अवस्थेतही अस्वस्थ करीत होती.
[…]

सलग 423 सामने आणि सिम्मोचे 16 षटकार

1954 ते 1969 या 15 वर्षांच्या कालावधीत ससेक्स संघाने काऊंटी चॅम्पिअनशिप स्पर्धेत खेळलेल्या सर्वच्या सर्व 423 सामन्यांमध्ये केनचा संघात ‘खेळणार्‍या अकरा’मध्ये समावेश होता! ओळीने 15 वर्षांत 4-2-3 सामने! 1953 ते 1969 या कालावधीतील (सलग) 17 हंगामांमध्ये 1,000 धावा काढण्याचा पराक्रम त्याने केलेला आहे.
[…]

एका दिवसात रणजींची 2 शतके आणि ‘वॉर्ना’गमन

…प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये दोन्ही डावात शतके काढण्याचे पराक्रम इंग्लिश जनतेला नवीन नव्हते पण एकाच दिवशी दोन्ही डावांत शतके? रणजींनी हा अचाट पराक्रम या दिवशी करून दाखविला.
[…]

सात त्रिक्रम आणि बोथमचे पुनरागमन

…आपल्या पुनर्प्रवेशानंतरच्या पहिल्याच चेंडूवर बीफीने ब्रूस एडगरला झेलबाद केले आणि सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या डेनिस लिलीच्या (तत्कालीन) विक्रमाशी बरोबरी केली. ग्रॅहम गूच त्याला खोचकपणे आणि मार्मिकतेने विचारला झाला, “अरे बीफी, तुझ्या संहिता (स्क्रिप्ट्स) लिहिते कोण?”
[…]

ऑलिंपिक क्रिकेट आणि निकालबदलू कसोटी

… आणखी दोन वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विनंतीवरून आंक्रिपने सामन्याचा निकाल बहालीवरून ‘अनिर्णित’ असा बदलला. थांबा. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सूचनेवरून (हा क्लब अत्यंत जुना आणि प्रतिष्ठित असून क्रिकेटच्या नियमांवर आजही त्याचेच राज्य आहे) पुढच्याच वर्षात आंक्रिपने सामन्याचा मूळ निकाल पुनःस्थापित केला.
[…]

जॉर्जला सोडा; नाहीतर खेळ खल्लास

सकाळी सकाळी ग्राऊन्समनने खेळपट्टीवरील आच्छादने काढली आणि तो सर्दच झाला…खेळपट्टी खणून ठेवण्यात आलेली होती जागोजागी. धक्का पण तो पडला ब्रिटिश. खेळपट्टी दुरुस्त करून खेळापुरती योग्य करविण्यास किती वेळ लागेल याचे गणित तो करू लागला. ते शक्य असल्याची जाणीव त्याला झाली पण…
[…]

हरहुन्नरी पाटील आणि वेळकाढू ‘क्लोज’

‘वेळ कसा मारुन न्यावा’ नावाचे पुस्तक वाचून आल्याप्रमाणे यॉर्की कप्तान वागत होता. ते त्याने वाचलेले नसेल तर कुणीही रसिक प्रेक्षक बसल्या बसल्या या शीर्षकाचे पुस्तक लिहून पूर्ण करू शकला असता! इंग्रजांना हे खपणार नव्हतेच. कप्तान ब्रायन क्लोज खपला.
[…]

मिथाली राजचा विक्रम आणि ‘कुजबुजणारा’ मृत्यू

‘त्या’ बालिकेने वयाच्या विसाव्या वर्षी टॉन्टन काऊन्टी ग्राऊंडवर इंग्लिश महिलांच्या संघाविरुद्ध 407 चेंडूंमध्ये 214 धावा काढल्या. त्यात 19 चौकार होते आणि 10 तासाला केवळ दोन मिनिटे कमी एवढा वेळ तिचे मैदानावर ‘राज’ होते. कॅरेन रॉल्टनचा नाबाद 209 धावांचा विक्रम तिने मोडला.
[…]

कॅलिप्सो धून आणि कॉवेन्ट्रीच्या 194

या बळीचा परिपाक … कॅरिबिअन बेटांवरील खेळाडूंच्या संघाने पहिल्याप्रथम इंग्लंडला त्यांच्याच देशातील कसोटी मालिकेत पराभूत केले. फ्रॅंक वॉरेल या सामन्यात खेळाडू म्हणून होते आणि वॉरेल, विक्स आणि वॉल्कॉट ही ‘तिडी’ या मालिकेनंतरच विख्यात झाली.

एग्बर्ट मूरने या विजयानंतर एक लोकगीत लिहिले आणि गायलेही.
[…]

1 32 33 34 35 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..