सकाळी सकाळी ग्राऊन्समनने खेळपट्टीवरील आच्छादने काढली आणि तो सर्दच झाला…खेळपट्टी खणून ठेवण्यात आलेली होती जागोजागी. धक्का पण तो पडला ब्रिटिश. खेळपट्टी दुरुस्त करून खेळापुरती योग्य करविण्यास किती वेळ लागेल याचे गणित तो करू लागला. ते शक्य असल्याची जाणीव त्याला झाली पण… […]
‘वेळ कसा मारुन न्यावा’ नावाचे पुस्तक वाचून आल्याप्रमाणे यॉर्की कप्तान वागत होता. ते त्याने वाचलेले नसेल तर कुणीही रसिक प्रेक्षक बसल्या बसल्या या शीर्षकाचे पुस्तक लिहून पूर्ण करू शकला असता! इंग्रजांना हे खपणार नव्हतेच. कप्तान ब्रायन क्लोज खपला. […]
‘त्या’ बालिकेने वयाच्या विसाव्या वर्षी टॉन्टन काऊन्टी ग्राऊंडवर इंग्लिश महिलांच्या संघाविरुद्ध 407 चेंडूंमध्ये 214 धावा काढल्या. त्यात 19 चौकार होते आणि 10 तासाला केवळ दोन मिनिटे कमी एवढा वेळ तिचे मैदानावर ‘राज’ होते. कॅरेन रॉल्टनचा नाबाद 209 धावांचा विक्रम तिने मोडला. […]
या बळीचा परिपाक … कॅरिबिअन बेटांवरील खेळाडूंच्या संघाने पहिल्याप्रथम इंग्लंडला त्यांच्याच देशातील कसोटी मालिकेत पराभूत केले. फ्रॅंक वॉरेल या सामन्यात खेळाडू म्हणून होते आणि वॉरेल, विक्स आणि वॉल्कॉट ही ‘तिडी’ या मालिकेनंतरच विख्यात झाली.
एग्बर्ट मूरने या विजयानंतर एक लोकगीत लिहिले आणि गायलेही. […]
भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतरच्या कालचक्रातील 16 वार्षिक आवर्तने पूर्ण झाल्याच्या दिवशी कसोटी सामन्यांमधील गोलंदाजाचे पहिले त्रिशतक पूर्ण झाले. (सतरावा किंवा आजचा तथाकथित ’त्रेपन्नावा स्वातंत्र्यदिन’ असे म्हणणे ही शब्दांची क्रूर थट्टा तर आहेच… […]
…खेळाडूने मारलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला. तो एकाने परत फेकला – तो आला आणि पडला ब्रूसच्या डोक्यावर! भुवयांजवळ जखम झाली. बिचारा जवळच्या दवाखान्यात टाके घालून घेण्यासाठी जात असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्याला एक कार धडकली. टाके घालण्याची प्रक्रिया … […]
हेडिंग्लेवर एक चमत्कार. वसिम अक्रमचा चेहरा धूमकेतूच्या शेपटाने माऊन्ट एव्हरेस्टला धडकून जाण्याची घटना नुकतीच पाहिल्यासारखा झाला होता. तब्बल सहा वर्षांच्या अंतरानंतर इंग्लिश कप्तान माईक आथर्टनने कसोटी सामन्यात चेंडू टाकण्यासाठी हात फिरवला होता… […]
1920मध्ये कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित झाले तेव्हा वॉरन वयाच्या पस्तिशीत होता. त्याचा धडाका नंतर टिकला नाही. एका कसोटीत दोन शतके काढणार्या या फलंदाजाला आपल्या कारकिर्दीतील पुढच्या शतकासाठी तब्बल 17 वर्षे वाट पाहावी लागली. […]
पाचूच्या बेटावरील ज्या 11 मानवी सिंहांनी राष्ट्राची पहिलीवहिली कसोटी 1981-82च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध खेळली त्यांमध्ये 18 वर्षांच्या अर्जुना रणतुंगाचा समावेश होता. श्रीलंका संघाने खेळलेल्या 100व्या कसोटीत अर्जुना होता, त्याचा ‘त्या’ दहामधील कोणताही सहकारी आता मात्र संघात नव्हता. […]