फ्रँक वॉरेल – पहिला ’काळा’ कर्णधार (क्रिकेट फ्लॅशबॅक)
1 ऑगस्ट 1924 रोजी वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील बार्बडोस बेटांवरील एम्पिरिअल क्रिकेट मैदानापासून जवळच असणार्या एका घरात एक बालक जन्माला आले. यथावकाश त्याचे नामकरण फ्रॅंक मॉर्टिमर मॅग्लीन वॉरेल असे करण्यात आले. हा पुढे जाऊन एक उच्च श्रेणीचा शैलीदार फलंदाज बनला. नियमितपणे वेस्ट इंडीजचे नेतृत्व करणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय खेळाडू ठरला, तेही एक डझन श्वेतवर्णीय कर्णधारांनंतर. क्रिकेटच्या सामाजिक इतिहासातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती.
[…]