प्रवासातील चित्तथरारक प्रसंग
आजूबाजूचं सौंदर्य नजरेने टिपत असताना काही मिनिटातच एकदम आरडाओरडा ऐकायला आला. समोर बघितलं तर मी सोडून दिलेली ‘गोंदोलो बोट’ पाण्यात पूर्णपणे उलटली होती. सर्वजण गंटागळया खात होते. जीवाच्या आकांताने ओरडत होते. […]
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…
आजूबाजूचं सौंदर्य नजरेने टिपत असताना काही मिनिटातच एकदम आरडाओरडा ऐकायला आला. समोर बघितलं तर मी सोडून दिलेली ‘गोंदोलो बोट’ पाण्यात पूर्णपणे उलटली होती. सर्वजण गंटागळया खात होते. जीवाच्या आकांताने ओरडत होते. […]
गगनभेदी इमारती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गाईड त्यांचे महत्व विषद करीत होता. फर्स्ट कॅनेडियन प्लेस (1165 फूट), कॉमर्स कोर्ट वेस्ट (942 फूट), ट्रुंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर (908 फूट), स्कोशिया प्लाझा (902 फूट), टीडी कॅनडा ट्रस्ट टॉवर (862 फूट), टोरेंटो डोमिनियन बॅंक टॉवर (732 फूट) अशा एका पेक्षा एक टोलेजंग व ऐतिहासिक इमारती प्रेक्षकांना आकर्षित करीत होत्या. पण मला ओढ लागली होती ती सीएन टॉवर पहाण्याची ! […]
जगातल्या ५ महत्त्वाच्या सस्पेंशन ब्रिज मधील सर्वोत्तम! जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पेक्षा लांब व मोठा असलेला इंजीनियरिंगचा चमत्कार! माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं हे आपण बऱ्याचवेळा ऐकतो आणि लोकांना समजावतो सुद्धा! ह्याची पुरे पुर प्रचिती देणारी एक जागा म्हणजे जपान मधला सस्पेंशन ब्रिज! आकाशी खाईक्यो .. […]
कॅनडा वैविध्यतेने नटलेला देश. या नव्या जगताने अल्पावधीत प्रगती साधली ती निसर्गाचा वरदहस्त लाभल्यामुळेच ! सुशिक्षित लोक, त्यांची वैज्ञानिकदृष्टी नि नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता यामुळेच हा देश सर्वांगिन क्षेत्रात प्रगत झाला. उत्तर अमेरिका खंडातील या संपन्न देशात आज पर्यटन करीत होतो. निसर्ग सौंदर्याने मनाला मोहीनी घातली होती. एका बाजुला अटलांटिक व दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला पॅसिफीक महासागर, देशांतर्गत नद्यांचे […]
देश, संस्कृती, भाषा, वेषभूषा, रहाणीमान आणि आचार-विचार अशा सगळ्याच आघाड्यांवरती एक वेगळेपण मिरवणारे हे जपानी. जपान देशाने त्यांचं वेगळेपण खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा जपलेले आहे. जगभरात जपानी खाद्यपदार्थ खुप लोकप्रिय आहेत हे आपण जाणतो. आजकालच्या लहानग्यांना आणि नवीन पिढीला नारुतो, डोरेमॉन इत्यादी पात्रांद्वारे जपानच्या संस्कृतीबद्दल किंवा भाषेबद्दल माहिती झालेली आहे. […]
विदेशी नि त्यातल्यात्यात पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल माझ्या मनात गैरसमजाचं काहूर माजलं होतं. पारतंत्र्याच्या काळात भारतीयांवर इंग्रजानी केलेल्या अन्याय, अत्याचारांमुळे त्यांच्याविषयी मनात घृणाच अधिक होती. परंतु सगळेच गोरे तसे नसतात याची अनुभूती कॅनडातील गोऱ्या लोकांच्या बाबतीत मला आली. अनेक चांगल्या, अनुकरणीय गोष्टी इथे पहायला मिळाल्या नि शिकता आल्या. त्यांची आगळी संस्कृती अनुभवता आली. […]
विदेशदौरा नि तोही विमानातून ……! विचारच न केलेला बरा. सगळे कल्पने पलिकडचे, स्वप्नवत वाटावे असेच ! शेजारच्या शहरात जायचे म्हटले तरी दहा वेळा विचार करावा लागायचा. खर्चाचा कधी ताळमेळ बसायचाच नाही. जग आज प्रगत झालंय, माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलाय. मंगळ, शुक्राचा तो वेध घेतोय …….. तिथे विमानातून विदेशदौरा, ही तशी आज सामान्य गोष्टच ! त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारणही नव्हते. पण आम्हा सामान्य माणसांच्या दृष्टीने ही गोष्ट तशी मोठीच ! […]
भारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार केल्याचे मी ऐकले. ही ‘मेड ऑफ दी मिस्ट’ काय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले. […]
हानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी! […]
साकुरा हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे का? असे सहज काही जपानी लोकांना विचारल्यास त्यातल्या ५०% लोकांकडून पटकन होकार मिळतो असा माझा अनुभव आहे. सर्व वयोगटात लोकप्रिय असणारे हे साकुरा. राष्ट्रीय फूल नाही बरं का! लोकप्रियताच ती केवढी; गल्लत होते अशी मग! साकुरा सिझन मध्ये मनमुराद आदरातिथ्य करवून घेता येते. जपान देशातल्या अगणित प्रेक्षणीय जागांवरती साकुराचा आनंद आपण घेऊ शकतो. हा साकुरामय जपान पाहणे आणि अनुभवणे नक्कीच एक सुंदर आठवण देऊन जाते हे मात्र खरे! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions