फितुरीने घात केला विजयनगर चा , आणि आपल्या संस्कृतीचा सुद्धा ! तो कदाचित सहज म्हणून बोलून गेला असावा , पण भारताची शेकडो वर्षांची दुर्दशा व्यक्त झाली होती. मित्रानो , केव्हा तरी जा हंपी पहायला . पर्यटन म्हणून नव्हे , तर फितुरीचे परिणाम काय होतात ते पहायला जा आणि पुढच्या पिढीला सावध करा . […]
दक्षिण अमेरिकेचा विचार मनात आला की ऍमेझोनची आठवण हमखास येते. नुसत ऍमेझोन म्हटल तरी तिचा सागरासारखा भासणारा विस्तार,त्यातले विविध प्रकारचे जलचर, प्रचंड उंचीची झाडे, दाट जंगल,तिच्या काठावरचे अजस्त्र कीटक, आणि त्यात उगवणा-या कमळांपेक्षाही जवळपास तीन फूट व्यास असणारी त्यांची पाने हे सर्व आठवायला लागते.त्यामुळे दक्षिण अमेरिकेला जायचे ठरवल्याबरोबर ऍमेझोन बघण्याचे आकर्षण होते. […]
संस्कृती आणि वारसा दोहोंची जपणुक या बाबत सर्वच युरोपीय देश आघाडीवर आहेत. इटली देशाची राजधानी रोममधेही हे दिसुन येते. सेवन हिल्समधे वसलेल्या या रोम शहराची पायी टूर करुन टायबर रीव्हर, रोमन फोरम, ट्रेव्ही फौंटन, सर्कस मँक्सीमस, पियाझा व्हेनीझिया, कलोझियम वगैरे ऐतिहासिक पार्श्वभूमी ची स्थळ बघताना जास्ती करुन भग्न अवशेषच बघायला मिळाले. रोम शहरातल्या ब-याचशा इमारती विटकरी […]
पाडोवा हॉटेलमाधुन चेकौट करुन आम्ही सर्वांनी जन गण मन चे समूहगान केल आणि तिथून 300 कीमीवरच्या पीसा शहराकडे निघालो. इटलीतील पीसाच्या झुकता मनो-याच्या आसपास अजूनही दोन ऐतिहासिक वास्तू आहेत; एक, बाप्टेस्ट्री जी इटलीतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाप्टेस्ट्री आहे आणि जीची घुमटासह उंची झुकता मनो-याहूनही थोडी जास्तच आहे आणि दुसर, पीसा कॅथेड्रल. या दोहोंच्या बरोबरच […]
काल ल्युसर्न लेकच्या क्रूझवर सर्वांनी खूप धमाल केली आणि उद्या चेकौट असल्याने हॉटेलवर जाउन सामानाची अवराआवर करुन सगळे झोपी गेले. आज सकाळी 8च्या सुमारास झुगपासुन दीड तासाच्या अंतरावरच्या liechtenstein, (अंंदाजे उच्चार लिंच्यटेनस्टाईन) कडे, निघालो. ऑस्ट्रीया आणि स्वित्झर्लंड देशांना जोडणारा आणि भरपूर निसर्गसौंदर्य लाभलेला हा छोटासा देश पर्यटकांच खास आकर्षण आहे. पांढ-या शुभ्र वीरळ ढगांच्या मागुन डोकावणा-या […]
आज रात्रीचा मुक्काम झुगच्या त्याच हॉटेलमधे होणार होता. तासभराच्या प्रवासानंतर एंजेलबर्गपासुनच योगेशनी माउंट टिटलिसच्या मायनस डिग्री तापमानाची कल्पना दिली आणि थर्मलवेअर, वुलन जँकेट, स्वेटर्स, टोप्यांची वारंवार आठवण करत सर्व लेव्हल्स आणि लंच कुपन्स्ची व्यवस्थित कल्पना दिली. एंजेलबर्गपासुन टिटलिसच्या टिकेटिंगपर्यंतचा निसर्ग कायमचा डोळ्यात साठवावासा वाटला. असा निसर्ग अजुन कुठे असेल अस वाटत नाही. केबल कारनी फर्स्ट लेव्हल […]
कॉफी चा स्वर्ग …… तसे पहिले तर व्हिएतनाम भरपूर मोठे राष्ट्र आहे त्यामुळे छोट्या सुट्टी मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिएतनाम बघणे नक्कीच शक्य नाही, तर मागे आपण व्हिएतनाम ची मुंबई पहिली तर आज बघुयात दिलवाले का शहर दिल्ली म्हणजेच व्हिएतनामचे राजधानी हनोई ची, जर तुम्ही पर्यटक असाल तर हनोई तुमच्या लिस्ट मध्ये सगळ्यात वर असायला हवे. आपल्या […]
कोलोनचे हॉटेल सोडून ब्लँक फॉरेस्टच्या घनदाट जंगलामार्गे आम्ही अंदाजे साडे चार पाच तासात सुमारे 490 किमी अंतर पार केले आणि टीटीसीच्या कूकू क्लॉक फँक्टरी भागात, भात, पोळीला फाटा देउन, चविष्ट राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. खूपच सुंदर जेवण होत. तिथून पुढचा -हाइन फॉल (Schaffhausen Neuhausen) हा 85 ते 90 किमीवर आहे. या मार्गावरुन जाताना दूतर्फा निसर्गानी हिरवेगार […]
तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. सरत्या भाद्रपदाचा हात धरून आश्विन हळूच येतो ….या दिवसातलं मध्येच पडलेलं ठसठशीत पण सोनेरी मृदू ऊन … त्याच्या येण्याची ग्वाही आपल्याला देतं … सृष्टीचे हे दिवस फारच सुंदर असतात …. श्रावण भाद्रपदात पेरलेल्या बीजांनी सुंदर …. भरलेलं रूप घेतलेलं असतं … सृष्टीची ही आनंदात डोलणारी हिरवी समृद्धी नव्या नवरी सारखी सजलेली […]