एकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच. […]
पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध असे किल्ले प्रबळगड व कलावंती सुळका आपल्याला इथे कोणत्याही ऋतूत भेट देता येते. हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारे आहे कारण पावसाळ्यात व हिवाळ्यात इथे दाट धुके असल्यामुळे जणू या परिसरात स्वर्गच निर्माण होते […]
पर्यटकांप्रमाणे इतिहासप्रेमींना, अभ्यासकांना, संशोधकांना, जिज्ञासूना, कोकण प्रेमीचना आणि सौंदर्याच्या उपासकांना विनालंब आणि बिनाअडथळा आनंद लुटत असतात. विजयदुर्ग-देवगड ही विजयी देशभूमी आहे. परशुरामाने वसविलेली ही पावन भूमी आहे.विजयदुर्ग-देवगड नावातच सर्व काही आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला येथील सौंदर्य स्थळांचा, निसर्ग स्थळांचा ऐतिहासिक स्थळांचा, परिचय करून देऊन पर्यटक इकडे मोठया संख्येने आकृष्ट करण्यासाठी २०१७ मधील विजयदुर्ग […]
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मालवण एस.टी. स्टॅंड पासून अवघ्या ७ ते ८ कि.मी. अंतरावर असलेले कांदळगाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कांदळगावचे श्री देव रामेश्वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा श्री देव रामेश्वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो. […]
गोव्याच्या माझ्या मित्राबरोबर त्याचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला. खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा. […]
हाराष्ट्र देशीचे हे राकट -कणखर दगड आतून अस्सल हिरे आहेत हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर नाशिक – शिर्डी मार्गावरील सिन्नर MIDC मधील, अशा अत्यंत बहुमोल किंबहुना ज्यांचे मोलच होऊ शकणार नाही अशा दगडांचे अप्रतिम “गारगोटी संग्रहालय ” पाहायला हवे. […]
जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा… […]
कराडचा प्रीतिसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना दोघी अगदी आमनेसामने येऊन एकमेकीना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रीतिसंगम मात्र त्याला अपवाद. […]