गोष्ट ३-४ वर्षापूर्वीची आहे. एका मोठ्या ग्रुप बरोबर मी या ट्रेकला गेलो होतो. एखाद्या मोठ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाताना नेहमीच मी रस्ता पाहून घेण्यासाठी जात असतो. ग्रुपच्या म्हणून अनेक मर्यादा असतात. आपल्याला हवा तसा मनसोक्त वेळ मिळत नाही. हवं तेव्हा, हवं तिथे हवं ते खाता येत नाही. फोटो काढण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. एकच फायदा […]
पानशेत धरणाचं बॅंकवॉटर जिथे संपतं तिथून साधारण तीन-चार किलोमीटर वर एक अतिशय अवघड घाट आहे. पानशेतनी खरच तळ गाठला होता. कोरडं जलाशयाच पात्र खरच आघात करणारं आहे. पण या प्रचंड जलाशयाचा ज्या झऱ्यातून उगम होतो, त्या झऱ्यावर एक छोटासा पूल आहे. तो पार करून पुढे गेल्यावर घाट सुरु होतो. सततच्या उल्लेखांमुळे वरंध किंवा ताम्हिणी हे खूप अवघड […]
भव्य हिमालय तुमचा, आमचा केवळ सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा!! ही कविता बहुतेक वसंत बापटांची आहे. आणि वैयक्तिक मला हिमालयाचं आकर्षण मुळीच नाही. अनेक ट्रेकर्स ‘एव्हरेस्ट’ सर करणं हे आपलं स्वप्न मानतात, माझी मात्र उडी सह्याद्रीच्या पुढे पडणार नाही. ‘ट्रेकिंग’चे सर्वच अनुभव खूप समृद्ध करणारे असतात. असच दोन एप्रिल महिन्यातच आम्ही ४-५ जणं […]
गणपती आणि गाणपत्य संप्रदायाचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे कै. जयंतराव साळगावकर ! त्यांनी हे सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर मालवणमध्ये बांधले आहे. येथे गणपतीचा थाट पूर्णपणे वैभवशाली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. रिद्धी सिध्दीही नेहेमी पाहायला मिळतात त्यापेक्षा वेगळ्या आहेत . गणपतीच्या दोन्ही बाजूंना मूषक जोडी, दोन बाजूंना लामणदिवे,अत्यंत देखणी प्रभावळ आणि राजेशाही चौरंग ही आणखी काही वैशिठ्ये ! गाभारा प्रशस्त आहे. त्यामानाने मंडप […]
मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. श्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या […]
सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, […]
सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे […]
आमच्या हरकुळ खुर्दतल्या मंतरलेल्या रात्री नंतरच्या रात्रीचा मुक्काम कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावातल्या जंगलात होता. आमचा इकडचा यजमान होता माझा रानवेडा मित्र डॉ. बापू भोगटे.. डॉ. बापू भोगटे हा जनावरांचा डॉक्टर. मुंबईतली चांगली ‘गोदरेज’ मधली नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात स्थायिक झाला..थोडे पैसे गुंतवून काजू, बांबूची लागवड सुरु केली..वेळ मिळेल तसा खांद्यावर बंदूक […]
गेल्या महिन्यात दोन-तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरायला गेला होतो. सिंधुदुर्गातले समुद्रकिनारे नितांत सुदर असले तरी यावेळी कोकणचं थोडं वेगळ आणि रांगड स्वरूप अनुभवायचं म्हणून समुद्र किनारे आणि गर्दीची ठिकाण मुद्दामहून टाळली होती. यासाठी आम्ही निवड केली होती कणकवली नजिकच्या हरकुळ खुर्द व कुडाळ जवळच्या पावशी गावाची.. मुंबईहून मी, राजेश जाधव, विनय कदम व महेश चाफेकर असे आम्ही […]