नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

रत्नागिरीचा ऐतिहासिक ठेवा

रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून हिंडतांना इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आठवतो…त्याचबरोबर अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देतांना स्थापत्यकलेचे अद्भूत नमुने न्याहाळता येतात. दापोली परिसरात फिरतांना कोकणचे अस्सल सौंदर्यही डोळ्यास पडते. म्हणूनच पर्यटकांचा या परिसराकडे जास्त ओढा असतो. […]

तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे. कनकेश्वर […]

कोकणचा मेवा – भाग १

आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
[…]

माझी पहिली वारी

जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात श्री. करंदिकरांनी मला वारीला येण्यासंबंधी विचारले. मी अजून पर्यंत वारीला गेलेलो नसल्याने मला तर जाण्याची इच्छा होती. करंदिकरांना तसे कळवताच ते त्या तयारीस लागले. त्यांनी आपल्या पुण्यातील मित्राशी संपर्क साधला व पुणे सासवड या प्रवासाची तयारी केली. सासवडला राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून हॉटेल बुकिंग संबंधी कळवले, व मला तसे कळवले. माझ्या परिचयातील सौ. भोसेकर यांचे कोणी नातेवाईक तेथे राहात असल्याचे माझ्या ऐकिवात होते म्हणून मी त्यांना आमच्या सासवडला जाण्याच्या कार्यक्रमाविषयी बोललो. त्यांनी सासवडला त्यांच्याच घरी राहाण्याचा आग्रह केला व तसे श्री. करंदिकरांनाही कळविण्याबद्दल त्यांनी मला सांगितले. त्यांच्या घरचा पत्ता व तेथे राहण्यासाठी संपर्क म्हणून त्यांच्या भावाचा फोन नंबरही कळवला. […]

“रोमहर्षक ढाक बहिरी ट्रेक”

तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी; माझे मीपण हरवून तुझ्यात हरवलेला मी…. जेव्हापासुन तु(सह्याद्री) आयुष्यात आलिस तेव्हापासुन असंच वाटु लागलंय.. कूठुन आलोय, कुठे जायचयं, दिशाहीन भरकटलेल्या नावेसारखा या माणसांच्या समुद्रात मी वाहत चाललो होतो…तुझ्या येण्याने निदान प्रवाह तरी मिळाला.. …
[…]

किल्ले विशाळगड

शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्‍या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे. […]

किल्ले अर्नाळा

ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्‍या नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे. वसईच्या किल्ल्याइतकाच महत्त्वाचा अर्नाळ्याचा जलदुर्ग आहे. अर्नाळा येथे जाण्यासाठी वसईतून गाडीमार्ग आहे. वसई-नालासोपारा-निर्मळमार्गे आगाशी-अर्नाळा असे गाडीमार्गाने जाता येते. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड फाटय़ावरुन विरार-अर्नाळा असेही […]

देव दर्शनास पूर्व परवानगी ?………….

माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.
[…]

स्वयंभू गणपती देवस्थान, मुगवली

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगांव पासून तीन कि.मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथे एक लोखंडी कमान आहे त्या कमानीतून गेल्यावर या फाट्यापासून दीड ते दोन कि.मी. अंतरावर मुगवली गावाजवळच हे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. […]

मल्हारी मार्तंड ! जय मल्हार !

उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्‍या खंडोबाची जेजुरी ! खंडोबा हे दैवत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही लोकप्रिय आहे. जेजुरी हे गाव पुण्यापासून अगदी जवळ आहे. या गावातल्या टेकडीवर खंडोबाची दोन ठिकाणी मंदिरं आहेत. पैकी एकाला पठार म्हणतात तर दुसर्‍याला गडकोट. कर्‍हेपठार या मंदिराच्या काहीशा वरच्या बाजुला गडकोट आहे. या मंदिराभोवती तटबंदी असल्यामुळे याला गडकोट म्हणतात. […]

1 35 36 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..