पूर्वीच्या काळी प्रवास म्हणजे केवळ कामापुरता केला जायचा. पायी अथवा बैलगाडीने एका जागेतून दुसऱ्या जागी जाणं एवढंच होतं. मजल दरमजल केलेल्या या प्रवासात एक वळकटी, तांब्या, घोंगडी आणि सोबतीला बहु उपयोगी असा सोटा. प्रवास फक्त दिवसा करायचा आणि संध्याकाळी एखाद्या धर्मशाळेत किंवा देवळाबाहेर मुक्काम. तीर्थक्षेत्राला जाणं हा जीवनातला मोठा आणि किंबहुना शेवटचा आणि लांबचा प्रवास. […]
आरोग्य व आरोग्यसेवेचा हक्क हा मानवाचा जन्मजात अधिकार म्हणता येईल. जगण्याचा – नागरिकत्वाच्या अधिकाराबरोबर आरोग्यदायी वातावरण व पुरेशी – नियमित आरोग्य सेवा आवश्यक असते. […]
माणसांना काही तरी छंद असतोच. काहींना क्रिकेट बघण्याचा छंद असतो, काहींना सिनेमा बघण्याचा, नाटकाचा, काहींना लिखाणाचा तर वाचनाचा छंद असतो. काहींना टीव्ही बघण्याचा तर काहींना तासन् तास मोबाईलवर खेळण्याचा छंद असतो. मला देखिल वाचण्याचा व लिहिण्याचा छंद आहे. तसेच माझे पती ‘टॉनिक’ अंकाचे संपादक मानकरकाका यांना भारतातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खूप छंद होता. […]
अवंतीपूर ! एके काळची काश्मिरची राजधानी . श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी ! समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक ! कलात्मकता , काव्यात्मकता , कौशल्य , कणखरपणा यांचा अद्वितीय संगम ! राजाधिराज अवंतीवर्मन यांनी आठव्या शतकात वसवलेली अद्वितीय , अप्रतिम राजधानी ! चिनार , देवदार सारख्या दीर्घायुषी वृक्षांची जाणीवपूर्वक केलेली […]
डिजिटल कॅमेऱ्यांचा बाजारपेठेत प्रवेश झाला आणि पर्यटकांची फोटोग्राफीची आवड असलेल्यांची चांदीच झाली. त्यात नवीन आलेल्या लेटेस्ट मोबाईल फोनने टुर्समधला प्रत्येक क्षण टिपायची चढाओढच सुरू झाली. चांगल्या फोटोग्राफीची आवड जोपासणाऱ्या एका वर्गाची काही वर्षात वाढ होत गेली. आणि यातूनच पर्यटन क्षेत्रातील फोटोग्राफी टुर्सचा जन्म झाला. […]
कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ? हा काय प्रश्न झाला का ? असं कुणालाही वाटेल . आणि खरंच आहे ते . पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो . सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात […]
सकाळी श्रीनगर सोडल्यावर पहलगामला जाताना हायवे च्या दोन्ही बाजूला पाचशे , पाचशे मीटर अंतरावर रायफलधारी जवान दिसत होते . मिलट्रीच्या गाड्या , ट्रक्स , जागोजाग होणारं चेकिंग मी पहात होतो . पेट्रोलिंग का सुरू आहे हे कळत नव्हतं. कदाचित काश्मीर मध्ये असलेल्या मिलट्रीच्या व्यवस्थेचा हा भाग असावा अशी मी मनाची समजूत घातली होती . […]
बदलती जीवनशैली, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, पैसा, मध्यमवर्गीयांच्या हातात खुळखुळणारा फिरण्यासाठी सहज उपलब्ध असलेली वाहतुकीची विविध साधने आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विविध पर्यटन कंपन्या यामुळे आता भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटन स्थळांचे सर्वसामान्यांना आता विशेष अप्रूप राहिलेले नाही. […]
आणखी एक असाच खेळ ज्यासाठी प्रेक्षक वर्षभरात आवर्जून हजेरी लावतात.. तो म्हणजे टेनिस… ह्यातल्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना.. फ्रेंच ओपन टूर्नामेंट, अमेरिकन ओपन टूर्नामेंट, ऑस्ट्रेलियन ओपन टूर्नामेंट आणि सर्वात मानाची म्हणून ओळखली जाणारी विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट… ह्या ही प्रत्येक स्पर्धसाठी त्यातील होणाऱ्या सर्व सामन्यांना मिळून, पर्यटक लाखाहून अधिक संख्येने उपस्थित राहून खेळातील उत्कंठा कायम ठेवतात. […]