नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

पासपोर्ट-व्हीसा-दूतावास

आजकालचा महत्त्वाचा दस्तावेज आणि परवलीचा शब्द म्हणजे पासपोर्ट. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडला आहे. पासपोर्ट म्हणजे पारपत्र. आपला देश पार करून दुसऱ्या देशात जर आपणाला जायचे असेल तर आपल्या सरकारकडून मिळालेली रितसर लेखी परवानगी म्हणजेच पासपोर्ट. कोणत्याही भारतीय नागरिकास हा पासपोर्ट मिळू शकतो. […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग ३

मोहरीच्या  पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण  पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा  वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले. […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग २

मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर  राजगड मोठ्या  दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते. […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग १

काही वर्षांपूर्वी युथ होस्टेल पुणे शाखा सिंहगड ते रायगड अशी शिवदुर्ग दर्शन साहस सहल आयोजित करीत असे. पुण्यातून रोज ३० जणांची तुकडी निघायची ती सर्व भ्रमण पूर्ण करून दहा दिवसांनी परत येत असे. युथ होस्टेल आयोजित हा टेक त्या काळात खूप प्रसिद्ध होता. दहा दिवसाच्या या ट्रेकचे वर्णन तीन भागात देत आहे. […]

चिनी कलेची विविधता – भाग ३

जेवणाची वेळ होईपर्यंत अशीच गंमत जंमत चालली होती. अर्थातच ‘तू’ जमातीची विवाहपद्धती परदेशी पाहुण्यांना माहीत करून देण्यासाठीच हा सगळा खेळ होता. जेवणाची वेळ होताच आम्ही सगळे आतल्या खोलीत गेलो, नेहेमी प्रमाणे टेबलाभोवती बसलो. ‘नवरा मुलगा’ आमच्या शेजारीच होता. सूपचा आस्वाद घेत होतो तोच ‘नवरीला’ बरोबर घेऊन तिच्या ‘सख्या’ जेवणघरात आल्या आणि ‘नवऱ्यामुला’च्या खुर्चीमागे घोळका करून दाटीवाटीने […]

चिनी कलेची विविधता – भाग  २

सूर्याने आपली केशरी सोनेरी आभा वाळूवर पसरली आणि वाळूचा रंगच बदलून गेला. जिथवर नजर जाईल तिथवर सोनेरी रंगाची उधळण झाली. सोन्याचा व केशराचा सडा मऊ मुलायम वाळूवर पसरला. मावळतीच्या सूर्याचा गोळा जणू अथांग वाळूवर वास्तव्याला आल्यासारखा अप्रतिम दिसत होता. आम्ही ते दृश्य डोळे भरून पहात होत तोच पुन: एक ५-७ घरांची वस्ती लागली. प्रवास सुरू केला […]

चिनी कलेची विविधता – भाग १

तिबेट या जगाच्या छपरावर ७-८ दिवस घालवून आमची तिबेटचा निरोप घेण्याची वेळ झाली तेव्हा लक्षात आले की प्रत्येक ट्रीप मध्ये निदान एकतरी स्थानिक कला परदेशवासीयांना दाखवली जाते. कधी नाच असतो कधी आपल्याकडच्या डोंबाऱ्यांच्या कसरतींसारख्या कसरतींचे खेळ असतात, प्राचीन काळच्या राहणीमानाची कल्पना देण्यासाठी एका छोट्याश्या खेड्यात भेट देण्याचा कार्यक्रम असतो. पण असले तिबेटच्या मुक्कामात काहीच नव्हते.तेंव्हा ही […]

सफारी इन माबुला – भाग २

आल्या आल्याच सुग्रास पंगतीचा बेत होता. खास ‘बिग५’ च्या देखरेखीखाली! जेवणगृहाच्या भिंतीवरून ते पाहुण्यांकडे लक्ष ठेऊन होते. सजावट विविध प्राण्यांची मुंडकी, कातडी, शिंगे वापरून केलेली होती, उजेडही आवश्यकते इतकाच. आफ्रिकन पदार्थ जेवणात होतेच पण इतरही चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. पदार्थांच्या चवी थोड्याश्या परिचित वाटत होत्या म्हणून चौकशी केली तर मुख्य आचारी भारतीय असल्याचे समजले. नुसत्या वासानेच […]

सफारी इन माबुला भाग – १

मी जात्याच भित्री असल्याने दक्षिण आफ्रिकेला जायचे टाळत होते. पण पूर्वी एका स्नेह्याकडून ऐकलेले आफ्रिकन सफारीचे वर्णन मोहही पाडत होते. भलं मोठं शिवार, उंच उंच गवत, मुक्त जंगली प्राणी आणि आपण मात्र उघड्या मोकळ्या जीपमध्ये ही कल्पना जरी रम्य असली तरी मला फारशी आकर्षक वाटत नव्हती. ह्यांना मात्र मनापासून तेथे जायचे होते, म्हणून आम्ही जोहान्सबर्ग व […]

एक आनंददायी भेट-सांताचं गाव!

“आज्जी, मला झोप येत नाहिये. गाणं म्हण ना!” “नाही नाही… गाणं नको! तू आपली गोष्टच सांग मला!” शाल्वलीचे एका मागोमाग पर्याय सांगणं चालूच होतं! तिचा रात्री ११ वाजता सुद्धा ताजातवाना असलेला आवाज एरवी कितीही छान वाटत असला तरी आत्ता तिला झोपविण्यासाठी काहीतरी करणे मला भागच होते. भसाड्या आवाजामुळे नातीला अंगाईगीत म्हणून झोपविणे तर मला शक्य नव्हते, […]

1 6 7 8 9 10 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..