नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

ईशान

HIV Rehabilitation centre ला जायचा माझा तो पहिलाच दिवस होता. एड्‍स हा स्पर्षानी होत नाही, डास चावण्यानी होत नाही हे सर्व माहिती असून मनाची तयारी व्हायला बरेच दिवस लागले. एका मित्राकडून माहिती मिळाली होती की इथे फ़क्त लहान मुलंच ठेवतात.
[…]

जैविक शेतीचा प्रसार आणि प्रचार

अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर बेसुमार वाढला. मात्र, याचे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतीक्षेत्रात नैसर्गिक खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. शिवाय जैविक पद्धतीने शेती करण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरी हे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
[…]

बबुआ, जनता भारी है !

काहीही न करता 15 वर्षे निवडून येण्याचा अनुभव लालूंच्या गाठीशी होता पण आपल्याला या जनतेनं कसं फसवलं याचं आश्चर्य त्यांच्या मनात मावेनासं झालं होतं. त्यातल्या त्यात आता घरी कसं जायचं याची चिंता त्यांना सतावत होती. कारण राबडीदेवींना दोन ठिकाणी उभं करून एकाही ठिकाणाहून निवडून आणू न शकल्याने घरात स्वागत कसं होतंय याची त्यांना काळजी लागून राहिली होती !
[…]

अप्रतिम निसर्गसौंदर्याच्या कवेत…

दार्जीलिंग हे भारतातील थंड हवेचे लोकप्रिय पर्यटनस्थळ. पश्चिम बंगालमधील या शहराला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ मानला जातो. दार्जीलिंग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. दार्जीलिग हिमालयन रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. टॉय ट्रेन ही दार्जीलिगची आणखी एक खासियत. या शहरामध्ये हिमालय आणि माऊंट एव्हरेस्टचे विहंगम दर्शन होते.
[…]

स्मार्ट फोनच बनला रिमोट

टीव्ही पाहताना रिमोटचा वापर अपरिहार्य बनला आहे. पण हल्ली टीव्ही केवळ वाहिन्या पाहण्यासाठीच नव्हे तर इंटरनेट, नेटवर्किंग साईट्स आणि इतरही अनेक अॅप्लीकेशन्साठी वापरला जातो. अशा वेळी ग्राहकाला रिमोटद्वारे टायपींगचीही गरज पडते. म्हणून स्मार्ट फोनचाच रिमोट म्हणून वापर करता यावा यासाठी काही अॅप्लीकेशन्स तयार करण्यात आली आहेत. टीव्ही कंपन्याही अशी अॅप्लीकेशन्स तयार करू लागल्या आहेत.
[…]

विचाराचे महत्त्व

शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या – स्वामी विवेकानंद

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते.

त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते. आणि यदाकदाचित ती यशस्वी झाली नाही तरी त्याचे होणारे परिणाम भोगण्यास आपण निश्चितच तयार असतो

विचार महत्वाचा कारण त्याच्या अनुषंगानेच पुढील कृती होत असते. म्हणून चांगल्या कृतीमागे चांगले विचार असतात.

प्रत्येकाने आपण काय विचार करतो याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे मग त्यामध्ये आपण आपल्या संबधी किती विचार करतो, समाजासाठी मी म्हणत नाही कारण ती मक्तेदारी फक्त राजकार्ण्यानीच घेतलेली आहे पण शेजाऱ्या संबंधी किती विचार करतो, आपल्या संपर्कात येणारी माणसे त्यांच्या बद्दल किती विचार करतो, निसर्गात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा किती विचार करतो आणि तो विचार जीवनमान सुधारण्यास, किंवा एखाद्याला जगण्याची उमेद देण्यास, वार्धक्याकडे झुकलेल्या व्यक्तीचा उत्साह वाढविण्यास तो कारणीभूत होतो कि नाही हे महत्वाचे.

एखाद्या रोपट्याची जोमाने वाढ होण्यासाठी जशी त्याला खात, पाण्याची गरज असते त्याच प्रमाणे चांगले विचार येण्यासाठी सुद्धा गरज असते ती चांगल्या वाचनाची, शुद्ध चारित्र्याची, निरोगी आरोग्याची, आणि मुख्य म्हणजे सुसंगतीची गरज असते नि या गोष्टी तुम्ही प्राप्त करून घेतल्यात कि चांगले विचार

आपोआप एकामागे एक येऊ लागतील जशी रेशीम लडी उलगडत जावी किंवा चित्रपटाची दृशे एकापुढे एक येऊन कथा पुढे सरकावी मग तुमचे चांगले विचार सर्व दूर पसरण्यास वेळ लागणार नाही आणि चांगल्या विचारांची कमीही पडणार नाही.

चांगले विचार जगण्याची नवी उमेद देतातच पण कठीण प्रसंगी धीरही देऊन जातात व भीतीचे उच्चाटन करतात आणि वाईट विचार येण्याचा मार्गाच बंद करून टाकतात. म्हणूनच संतमंडळी सांगतात ” सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ” म्हणजे जेणे करून सुविचार प्रसवतील व समाज सुधारण्यास मदत होईल हे निश्चित.
[…]

1 98 99 100 101 102 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..