नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

प्रतिदहशतवादाचे उभे आव्हान

मुंबईवरील 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपीला अजून शिक्षा झालेली नाही. एवढेच नव्हे तर 1993 च्या स्फोटातील आरोपींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब न झाल्याने ते जामिनावर सुटून मोकाट फिरत आहेत. वाढत्या दहशतवादाला जनतेची उदासिनता, न्याययंत्रणेतील विलंब, माध्यमांचा उथळपणा या बाबी कारणीभूत आहेत. आता तर वाढता प्रतिदहशतवाद हीसुद्धा चिंताजनक बाब ठरत आहे.
[…]

आत्मकेंद्री व्यवहार दहशतवादाला पोषक

26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यामुळे समाजाची झोप उडाली नाही. आज समाजाचे व्यवहार प्रचंड अर्थकेंद्री बनले असल्याने आजूबाजूला घडणार्‍या दुर्दैवी घटनांची नोंद एका मर्यादेपर्यंतच घेतली जाणार असेल तर एकसंघ समाज म्हणून आपण देशापुढील समस्यांना कधी आणि कसे सामोरे जाणार याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
[…]

राजांचा गैरव्यवहार आणि कॅगचा अहवाल

2007-08 मध्ये झालेल्या टूजी स्पेक्ट्रम आणि परवान्यांच्या वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपामुळे केंद्रीय माहिती आणि दळणवळण मंत्री ए. राजा यांना राजीनामा द्यावा लागला. या घोटाळ्याचा तपास करण्याची जबाबदारी महालेखा परिक्षकांकडे (कॅग) ती. कॅगच्या अहवालानेच राजा यांना मंत्रीपद गमवावे लागले. या अहवालात नेमके होते तरी काय ?
[…]

धोका फुफ्फुसाच्या कर्करोगाचा

धूम्रपान हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सिगारेटच्या धूरातील कार्सिनोजेन्समुळे हा कर्करोग जडतो. हा कर्करोग जडल्यानंतर रुग्ण वाचण्याची शक्यता अत्यल्प असते. निदानानंतर या कर्करोगाचे साठ टक्के रुग्ण वर्षभरातच मृत्यूमुखी पडतात. या व्याधीपासून दूर राहायचे असेल तर ताबडतोब धूम्रपान सोडायला हवे.
[…]

युडीआरएस : तंत्रज्ञान की अचूकता ?

मैदानावरील पंचांचा एखादा निर्णय चुकल्यास खेळाडूंना त्याविरुद्ध तिसर्‍या पंचाकडे दाद मागता येते. युडीआरएस या पद्धतीत हे शक्य आहे. आयसीसीने ही पद्धत वापरायचे ठरवले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा युडीआरएसला ठाम विरोध आहे. खेळाडूंमध्येही या पद्धतीबद्दल अनेक मतभेद दिसून येत आहेत. शेवटी ही पद्धत किती अचूक ठरेल यावरच तिचे भवितव्य अवलंबून आहे.
[…]

निर्व्यसनी

लग्न जमवण्याच्या बैठकीतील संवाद;

मुलाचे मामा : मुलगा एकदम निर्व्यसनी आहे बरं का. सुपारीचे खांड

सुद्धा खात नाही.
[…]

खेळ खातेवाटपाचा

नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा मुहूर्त निश्चित झाला की त्यातील खात्यांविषयी स्पर्धा सुरू होते. मंत्र्यांच्या दृष्टीने विशिष्ट खाती खास महत्त्वाची असतात. अशी खाती निधीचा मोठा ओघ असणारी असतातच पण मलिदा खाण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. त्याच वेळी मंत्रिमंडळात नाईलाजाने घ्यावे लागलेल्यांच्या पदरी ‘उपेक्षित’ खाती टाकली जातात. असा हा खातेवाटपाचा खेळ नेहमीच रंगत राहतो.
[…]

कुठे आहेत स्त्रियांच्या चळवळी ?

मुंबईतील पोलिस निरीक्षकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराची घटना चर्चेत आहे. आता तर नूतन उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने तपासकार्यावरील दबाव वाढला आहे. वास्तविक कायद्याच्या रक्षकानेच जनतेचे शोषण केल्यास त्यांना अधिक कडक शासन व्हायला हवे. शिवाय स्त्रियांच्या तसेच युवकांच्या सामाजिक चळवळींबरोबरच पुरुषांना स्त्री दाक्षिण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
[…]

1 100 101 102 103 104 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..