मागे एकदा संपादकांनी आम्हाला राशिभविष्य लिहायला सांगितले. आता हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही कन्या राशीला लिहिले होते की ‘सुखद घटना घडेल व दिवस आंनदात जाईल.’
तुम्हाला सांगतो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही प्रेसच्या ऑफिसमधून घरी जात असताना, वाटेत आमचा एक कन्या राशीवाला परममित्र दिन्या भेटला. […]
ह्या अभिनव कार्यक्रमाची नोंद माझ्या मनाने तर घेतली होती पण ह्या माझ्या आनंदात तुम्हालाही सहभागी करून घ्यावे असे वाटल्याने हा लेख प्रपंच!!
कार्यक्रमात एका पुणेकर म्हटला कि ‘पुणे तिथे काय उणे’ असं असलं तरी मला आता म्हणावेसे वाटतेय कि “ठाणे तिथे काय उणे” तेव्हा हे ८४ वे साहित्य संमेलन “जरा हटके” होणार यात वादच नाही…. […]
सत्तेचा सारीपाट वेगवेगळे रंग दाखवतो. असेच काही रंग सरत्या आठवड्यात पहायला मिळाले. काहीशा अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या सत्तेतले कारभारी बदलले गेले. एव्हाना सारे काही शांत होत आहे. काहीजणांना मात्र घडल्या प्रकाराने भलतेच वाईट वाटले. अशी काही ज्येष्ठ नेतेमंडळी मंत्रालयाजवळ जमली आणि त्यांच्यात गिले-शिकवे काव्यात मांडण्याचा सिलसिला सुरू झाला. त्याची ही काल्पनिक हकिकत… […]
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते. […]
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे. […]
कामाच्या ठिकाणी महिलांना अनेकदा केवळ स्त्री असल्यामुळे वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागते. सरकारने अशा घटनांबद्दल कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला आहे. मंत्रिमंडळाने या कायद्याचे विधेयक मंजूर केले असून ते संसदेत लवकरच मंजूर केले जाईल. या कायद्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. अर्थात, त्यातील काही त्रुटीही लक्षात घ्यायला हव्यात. […]