इतर सर्व
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
ज्येष्ठांच्या निर्वाहासाठी नियम २०१०
भारतीय संस्कृतीत कुटुंबसंस्थेस महत्त्वपूर्ण स्थान आहे. परंतु या सध्याच्या परिस्थितीत विभक्त कुटुंब पध्दत उदयाला येताना दिसते. सर्वात मोठा प्रश्न आहे तो वृध्दांचा (ज्येष्ठ नागरिकांचा). मुलांचा सांभाळ करुन त्यांच्यावर चांगले संस्कार केल्यानंतर करिअरच्या मागे धावणार्या मुलांनी पालकांकडे पाठ फिरविली. अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांसमोर प्रश्न आहे तो आधाराचा. मुलं वृध्दापकाळातील आधाराची काठी असतात, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते, परंतु याचा विसर पडू लागला आहे. आता यावर उपाय म्हणून शासनानेच लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी व कल्याणासाठी नियम २०१० तयार केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात अडचणी येणार नाहीत, त्यांना जगण्यासाठी त्रास होणार नाही यांची काळजी घेतली आहे.
[…]
सुट्टय़ांच्या काळात अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी मोहिमेची गरज – गृहमंत्री आर आर पाटील
दिवाळी आणि एप्रिल-मे महिन्यांच्या सुट्टय़ांच्या काळात राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढलेले असते. दरवर्षी सुमारे १२ हजार इतक्या लोकांचे मृत्यू रस्त्यावरील अपघाताने होतात तर सर्वसाधारण ५० हजार लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या सुट्टय़ांच्या काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेण्याची गरज गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली.
[…]
रेखाटलेला महाराष्ट्र…
वैभवशाली इतिहासाचा गौरवशाली कर्तृत्वाचा महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव उत्साहात, दिमाखात वर्षभर साजरा करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखिल राज्याची प्रगती विविध प्रकाशनांच्या माध्यमातून जनतेसमोर आणली आहेत.
[…]
मिल्क एटीएमचे वेधक तंत्र
एटीएम मशीनमधून हवी तेव्हा आणि हवी तिथे रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली. याच धर्तीवर अनेक ठिकाणी विविध प्रकारची व्हेंडिग मशीन्सही आढळून येतात. अशा परिस्थितीत प्रत्येक घराची मुलभूत गरज असलेले दूध हवे तेव्हा का मिळू नये असा प्रश्न समोर येतो. कॉर्पोरेटजगतातील नवतेचे अनुकरण करत दुग्ध व्यवसायानेही अलीकडेच कूस पालटत एटीएम तंत्राचा अंगीकार केला आहे. या तंत्राचा खास वेध.
[…]
बाल निरीक्षणगृहास (रिमांड होम) आयएसओ
सार्वजनिक क्षेत्रात सेवा देणार्या उद्योगांनी गुणवत्तेचे निकष पूर्ण केल्यास संबंधित संस्थेला आयएसओ ९००१/२००० मानांकन मिळत असते. खाजगी संस्थेबरोबर शासकीय संस्थाही आता आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना मिळणारे आयएसओ मानांकन म्हणजे खाजगी सेवा क्षेत्रा इतकेच तोडीस तोड सेवा देऊन नागरिकांच्या सेवेला सदैव हजर असल्याची ती एक पोचपावतीच होय.
[…]
संरक्षणाचे धोरण ‘प्रोअॅक्टिव्ह’ हवे
पाकिस्तानला चीनकडून मळणारी मदत आणि पाकपुरस्कृत दशहतवाद्यांच्या भारतातील कारवायांच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षाव्यवस्था अधिक सतर्क असायला हवी. आलेल्या संकटांना तोंड देण्याचे आजवरचे धोरण सोडून देऊन भविष्यात ही संकटे येऊच नयेत म्हणून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आपल्याला मूळ धोरणातच बदल करायला हवा.
[…]
राजकीय मुत्सद्देगिरीतून आर्थिक विकास
अणुइंधनाने समृद्ध असलेल्या राष्ट्रांनी भारतावर लादलेले निर्बंध दूर करत अमेरिकेशी अणुकरार करणार्या मनमोहनसिंग यांनी जपानशी आर्थिक सहकार्याचा करार करून पुढचे पाऊल टाकले. या कराराद्वारे त्यांनी देशाचा आर्थिक विकास साधण्याच्या प्रयत्नाबरोबरच राजकीय मुत्सद्देगिरीचाही नमुना पेश केला. या प्रयत्नांमुळे विकासदर 10 टक्क्यांवर जाऊन चीनच्या भारतविरोधी धोरणांनाही खीळ बसू शकेल.
[…]
अव्यवहार्य योजनेचा अट्टाहास
राष्ट्रीय सुरक्षा समितीने केंद्र सरकारला नुकतेच अन्न सुरक्षा विधेयक सादर केले. त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रयरेषेखाली तसेच सामान्य आणि सधन जीवन जगणार्या लोकांना दरमहा 35 किलो धान्य माफक दरात दिले जाणार आहे. अशा प्रकारची योजना लागू करण्याचा सोनिया गांधींचा अट्टाहास आहे. पण, त्यापायी या योजनेतील त्रुटींकडे दुलर्क्ष करण्यात आले आहे. […]