नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

राज्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही निवड निश्चित होईल असे दिसते. मुख्य म्हणजे आपल्याला हवी ती व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी विराजमान व्हावी यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि केंद्रातील मंत्री विलासराव देशमुख हे दोघेही कसून प्रयत्न करत आहेत. ही त्यांच्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची नामी संधी आहे. यात कोण बाजी मारतो हे पहायला हवे.
[…]

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नियोजनबध्द शेती

शिक्षणास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि उत्पन्नात भरीव वाढ करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील रहिवासी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी घालून दिले आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. चव्हाण यांनी फळबाग आणि भाजीपाला पदविका मिळविली. पदविका घेत असतानाच ते खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राचे सदस्य झाले आणि कृषिविषयक माहिती घेऊ लागले.
[…]

साठवणुकीकडे कानाडोळाच

योग्य साठवणुकी अभावी लाखो टन अन्नधान्य वाया जाण्याच्या घटना देशात अनेकदा घडतात. त्यासंदर्भात सरकारवर तसेच कृषी खात्यावर वेळोवेळी ताशेरेही झाडण्यात आले आहेत. तरीही धान्य साठवणुकीचा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित आहे. खरीप हंगामात झालेले अधिक उत्पादन आणि रब्बीतील उत्पादनवाढीची शक्यता लक्षात घेता अजून तरी शासनाने साठवणुकीबाबत काही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही.
[…]

“लिव्ह इन”लाही कायद्याचे संरक्षण

भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला विशेष महत्त्व आहे. पण, आता बदलत्या काळानुसार ‘लिव्ह इन रिलेशनशीप’लाही समाजमान्यता मिळाली आहे. अशा नात्यात एकत्र राहण्यासाठी तसेच वेगळे होण्यासाठी ही कोणाच्या परवानगीची गरज नसते. पण, विभक्त झाल्यानंतर स्त्रीला पोटगी मिळावी, घरगुती हिंसाचार कायद्यानुसार तिला संरक्षण मिळावे तसेच अपत्यांची जबाबदारी कोणी घ्यावी यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच भाष्य केले.
[…]

घराणेशाहीची अपरिहार्य चौकट

‘आपण शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला लादत नसतो’ असे म्हणत सेनाप्रमुखांनी नातू आदित्यला शिवसेनेचा पुढील वारसदार म्हणून पेश केले. त्यामुळे शिवसेनेतील घराणेशाहीविषयी चर्चा सुरू झाली. अलीकडे प्रत्येक पक्षात घराणेशाही दिसते. काँग्रेसने तर ही परंपरा आजवर जपली. आश्चर्य म्हणजे घराणेशाही आणणार नाही असे सांगणारे प्रत्यक्षात त्याचा पुरस्कार करतात. घराणेशाही ही राजकारणातील अपरिहार्य चौकट बनली आहे.
[…]

मानवतेचा पुरस्कार करणारा महात्मा

पांडुरंगशास्त्री आठवलेंनी अवघ्या समाजाला माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म नव्याने दाखवून दिला. त्यांचे सहजसुंदर तत्त्वज्ञान अवघ्या जगात प्रसिद्धी पावले. रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन पुरस्कार, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. आज समाजातील सौहार्द संपत असताना आणि जातकारण वाढत असताना पांडुरंगशास्त्रींच्या तत्त्वज्ञानाचा नव्याने जागर होण्याची गरज आहे. 25 ऑक्टोबर रोजी येणार्‍या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागवलेली आठवण.
[…]

वाघाला पहायचंय, चला बोरला …

वर्धा जिल्हा जसा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो तसाच तो येथील वन वैविध्यामुळे ओळखला जातो. यात प्रमुख आहे तो बोर अभयारण्य प्रकल्प.बोरला जायचे ठरविले अन तयारीला लागलो.
[…]

कवडी मोल

तुम्हाला पन्नास पैसे व रुपयाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल का ?
[…]

1 109 110 111 112 113 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..