क्रेडिट किवा डेबीट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहक आणि दुकानदार दोघांचेही बरेच श्रम वाचतात. परंतु, ग्राहकाने अदा
केलेली रक्कम दुकानदाराबरोबरच बँकांमध्येही विभागली जाते. यात दुकानदाराच्या नफ्यातील जवळजवळ अर्धी रक्कम खर्च होते असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दुकानदार कार्ड पेमेंटपेक्षा रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. […]
मी दुसरी किंवा तिसरीत असताना (१९७२-७३ साली) झाडांविषयक काहीतरी उपक्रमासाठी केलेली ही एक कविता … पहिल्या दोन ओळी आता जिथे तिथे दिसतात मला आठवत नाही की त्या मी सुचून लिहिल्या होत्या की त्या वाचूनच मला ही कविता सुचली होती ..
कलेचे आदिवासी जमातीशी असलेले घनिष्ट नाते वारली चित्रकलेतून दिसून येते. या समाजाने परंपरेने लाभलेली ही कला जतन केली आहे. या कलेच्या माध्यमातून आदिवासी युवकांना रोजगाराची संधी ही उपलब्ध झालेली आहे. […]
श्री समर्थ आणि दीपज्योती बचत गटाने नुकतेच सुरु केलेले पेस्ट कंट्रोल हे पुण्यातील पहिलेच युनिट ! पापड, कुरडई करणार्या महिला आता पेस्ट कंट्रोलसारख्या व्यवसायातही आपले अस्तित्व दाखवत आहेत. पुणे जिल्ह्यातील वडगांव बु।। येथील समर्थ महिला बचत गटाने पुरुषांच्या मक्तेदारीला बगल देवून आपले सामर्थ्य सिध्द करुन दाखवले आहे. […]
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील विजेता महिला बचत गटाने नावाप्रमाणे विजयी घोडदौड सुरु केली आहे. लेडीज पर्स व प्रवासी बॅगा बनविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे. […]
आदिवासींच्या बोहाडा या उत्सवासाठी विविध मुखवटे बनविण्याची वडिलोपार्जित कला जोपासत स्वत:च्या कर्तृत्वाने कागदाच्या लगद्यापासून सुंदर मूर्ती बनविण्याचे काम जव्हार तालुक्यातील रामखिंड येथील पेपरमेशी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट करीत आहे.ही कलाकृती त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेण्याचा मान मिळविला आहे. […]
वारली चित्रशैली हे ठाणे जिल्ह्याचे वैभव. त्रिकोण, चौकोन, वर्तुळे आणि रेषा वापरून आदिवासी महिलांनी घरातल्या भिंतीवर ही चित्रे रेखाटली आणि आज या कलेला समाजमान्यता मिळाली. […]