अमेरिकेत बेकारी पुन्हा वाढू लागली असून त्यावर मात करण्यासाठी ओबामांना आर्थिक सवलतींची नवी योजना जाहीर करावी लागणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकन काँग्रेसच्या द्वैवार्षिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील आर्थिक परिस्थिती न सुधारल्यास निवडणुका जिकणे डेमॉक्रेटिक पक्षाला कठीण जाणार आहे. या समस्येवर वेळीच योग्य उपाय योजले न गेल्यास दुसर्या मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. […]
बेटिंग आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाने संपूर्ण क्रिकेटविश्व ढवळून निघाले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भात रोज नवनवीन माहिती प्रसिध्द होत आहे. अशा परिस्थितीत बेटिग कसे चालते, फिक्सिंग म्हणजे काय याची भरपूर उत्सुकता पहायला मिळत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीबरोबरच एकूणच क्रिकेटविश्वाबद्दल शंकास्पद परिस्थिती निर्माण करणार्या बेटिंगविश्वाचा खास वेध. […]
गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर त्यासाठी इच्छाशक्तीची, सद्सद्विवेकबुद्धीची गरज असते. गणेशोत्सव मंडळांनी समाजाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन उत्सव विधायक पद्धतीने साजरा करायला हवा. उत्सवाच्या निमित्ताने गणेशासमोर नतमस्तक होऊन केवळ प्रार्थना करून चालणार नाही तर प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या साहाय्याने ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे. […]
साध्या रुपातला मनमोहक, सोज्ज्वळ गणू मला भावतो. तो माझ्यासाठी आशीर्वाद देणारा देव नसून म्हणणं ऐकून घेणारा जीवलग सखा आहे. त्याच्या उदारपणामुळेच आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आजकाल गणेशोत्सवाचं स्वरुप खूप पालटलं आहे. त्याबद्दल खूप दु:ख वाटतं. प्रत्येकाने गणेशोत्सव स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर श्रद्धेने आणि भक्तीभावाने साजरा करावा असं मला वाटतं. […]
गणेशाची लोकप्रियता चराचर व्यापली असून त्याच्या मूर्तीत अनेक लोभस रूपं दिसतात. लंबोदर, सुपासारखे कान असलेला, भक्तांवर दया करणारा, प्रकृतीपुरूषांच्या पलीकडचा असा हा गणेश सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे. पृथ्वीतलावरील त्याचे आगमन जल्लोषात पण जबाबदारीने साजरे करायला हवे. आजच्या असुरक्षित सामाजिक वातावरणात तर जल्लोषाला जबाबदारीचे भान असण्याची नितांत गरज आहे. […]
बुद्धीची देवता असलेल्या गणपतीला पूजेमध्ये अग्रक्रम दिला जातो. तो सुखकर्ता, दु:खहर्ता आणि विघ्नविनाशक आहे. सुखकर्ता म्हणजे रचनाकार, दु:खहर्ता म्हणजे सुव्यवस्थाकार आणि विघ्नविनाशक म्हणजे प्रणाली निर्माण करणारा. गणपतीचा हा मूळ अर्थच आज विस्मृतीत गेला आहे. त्यामुळे कुठेही आराखडा, सुव्यवस्था आणि प्रणाली दिसत नाही आणि आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते. […]