सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे. […]
सध्याच्या खासगीकरणाच्या जमान्यात सरकारचे कोणत्या क्षेत्रावर नियंत्रण असावे अथवा नाही असा प्रश्न उद्भवत असतो. खासगी शिक्षण संस्थांबाबत असा प्रश्न वारंवार निर्माण होत होता. या संदर्भात सरकारला खासगी शिक्षण संस्थांकडून आकारल्या जाणार्या शुल्कावर तसेच देणग्यांवर नियंत्रण ठेवता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे आता खासगी शिक्षणक्षेत्र खर्या अर्थाने मुक्त होणार आहे. […]
घटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. कोणताही गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी अंतिम निवाडा होईपर्यंत आरोपीला जामिन दिला जात. त्यासाठी गुन्ह्यांचे जामिनपात्र आणि अजामीनपात्र या दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. जामीनाचा निर्णय देताना उच्च आणि सत्र न्यायालयांमध्ये विसंगती आढळते. ही विसंगती वेळीच टाळायला हवी. […]
सोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. यात त्यांचे मोठेपण सामावल्याचे पक्षातील अनेक नेतेमंडळी सांगतात. पण, त्या मोठ्या सामाजिक कार्यातून किवा राजकीय परंपरेतून पुढे आलेल्या अभ्यासू नेत्या नाहीत. शिवाय आता नेहरू घराण्याची परंपरा सांगण्याशिवाय कोणताही जमेचा मुद्दा उरला नसल्याने काँग्रेसला सोनियाजींच्या आधारावरच मते मागता येणार आहे. त्यामुळे सोनियांची मक्तेदारी निर्माण होत आहे. […]
श्री गणेशाचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ? […]
प्रतिजैविकांना दाद न देणारा सुपरबग प्रकटल्याने अवघे वैद्यकीय विश्व चिताक्रांत बनले आहे. पाश्चात्यांनी सुपरबगच्या निर्मितीसाठी सोयीस्करपणे भारताला जबाबदार धरले असले तरी त्यात तथ्य नाही. सुपरबगची निर्मिती पाश्चात्य राष्ट्रांमध्येच झाली असावी. असे असले तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून सुपरबगवर परिणामकरक प्रतिजैविक शोधण्याची जबाबदारी भारतावरही आहे. […]
अथर्वशीर्ष हा उपनिषद् मंत्र असल्याने त्याच्या सुरवातीला व शेवटी शांती मंत्र आहे. अथर्वण ऋषी प्रारंभी मंगलाचरण करण्याच्या हेतूने ॐ हा मंगलमय शब्द उच्चारतात. त्यानंतर त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तत्वमसि हा शब्द खूप महत्वाचा आहे. अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्व. तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहे असे ते म्हणतात. तूच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म आहेस. […]