नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

इंग्रजी शिकण्याची सोपी पध्दत

कुठलीही भाषा आत्मसात करणे, म्हणजे दुसर्‍याने बोललेली किंवा लिहिलेली भाषा समजणे होय. तसेच त्या भाषेत आपल्या मनातील विचार व्यक्त करता आले पाहिजेत. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेची जाण व अभिव्यक्ती या दोन्ही गोष्ट आवश्यक आहेत. आपण आपली मातृभाषा आई-वडील, कुटूंब व शेजारी पाजारी यांच्याशी बोलून अथवा ऐकून शिकत असतो. इंग्रजीही अगदी त्याचप्रमाणे सहज शिकू शकतो.
[…]

शेंदुर्णीचे त्रिविक्रम मंदिर

मी आपल्याला खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहे. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन ‍श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली.
[…]

डोंगरावर साकारले कृषि पर्यटन

जिद्द आणि कष्टातून फोंडय़ा माळरानातील डोंगर फोडून तयार केलेल्या शेतीत घेतलेली विविध पिके आणि शेती आधारित प्रक्रिया उद्योगामुळे जयश्री मानकुमरे यांच्या शेतात कृषि पर्यटनाचा विकास झाला आहे.
[…]

सौर ऊर्जेवरील मोटारीमुळे शेतकर्‍यांना दिलासा

हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्पाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग करुन वीजेच्या भारनियमनावर मात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे.
[…]

कुपोषणावर प्रभावी ‘अमरावती मिक्स’

बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्‍यामार्फत तयार करण्यात येतो. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
[…]

आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचं व्रत

……………मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले. […]

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमासाठी देशभरात एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी)

शहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.
[…]

नंदीबैलवाला…….

नंदीबैलाचे खेळ करणे, भविष्य सांगणे यावर नंदीबैलवाल्यांची उपजिविका असते. नंदीबैलवाले मुळ आंध्रातले. ‘तिरूमल` हा त्यांचा मुळ देव. सरोदे, शिंदे, पवार, जाधव अशी नंदीबैलवाल्यांची आडनावे असतात. औरंगावबाद जिल्हातिल पैठण जवळी जेवूर हैबती हे नंदीबैलवाल्यांचे मुळ गाव.
[…]

1 120 121 122 123 124 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..