नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

सूर्यकांत डोळसे प्रस्तुत २६/११ च्या वीरांना श्रद्धांजली

२६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना एक काव्यात्मक श्रद्धांजली. सुप्रसिद्ध कवी सूर्यकांत डोळसे यांच्या या कवितेचे वाचन त्यांच्याच आवाजात. अत्यंत सुंदर सादरीकरण !
[…]

आयकर रिटर्न्स भरायचे राहिलेत

आयकर भरणे म्हणजे खूप गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया असल्याने तो टाळणे हा सर्वसामान्यांचा समज असतो. परंतु, आयकर पत्रिका भरणे अनेक कारणांमुळे विशेष आवश्यक ठरते. घटनेनुसार ते बंधनकारकही आहे. वेळच्या वेळी आयकर न भरल्याने आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर 4 ऑगस्टपर्यंत आयकर भरला नसेल तर कोणते पर्याय समोर आहेत हे तपासून पहायला हवे.
[…]

जीपीएस तंत्राची वेधक सफर

वाढत्या जागतिकीकरणामुळे नोकरी किवा व्यवसायाच्या निमित्ताने फिरण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. अनोळखी प्रदेशात असताना एखादे ठिकाण शोधणे अवघड असते. विशेषत: तेथील भाषा अवगत नसल्यास हे काम अधिक जिकीरीचे बनते. अशा वेळी जीपीएस किवा डिजिटल मॅप्सची सेवा हाताशी असल्यास नेमके ठिकाण शोधणे सोपे बनते. या तंत्रज्ञानाचा ताजा वेध.
[…]

दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी हवी

महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीमुळे पुण्यात बराच गदारोळ झाला. या पार्टीत अटक झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे परवाना नसतानाही मद्य पुरवणार्‍या मद्य विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यक्तींना शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर देशभर दारूबंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.
[…]

खेळाशीच `खेळ’

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा तोंडावर आल्या असताना एकीकडे स्पर्धेची तयारी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. तर दुसरीकडे रोजरी भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा परिस्थितीत खेळ, खेळाडू आणि देशाची प्रतिष्ठा याचा विचार कोणीही करत नाही. प्रत्येकाला या स्पर्धेनिमित्त वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे असून स्पर्धा झाल्या नाहीत तरी त्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
[…]

सौर सुनामी खरंच येणार ?

सूर्यावर घडलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या चुंबकीय घडामोडींमुळे विद्युत्भारित कणांचा एक महाकाय ढग पृथ्वीच्या दिशेने भिरकावला गेला. हा ढग कोणत्याही क्षणी पृथ्वीला तडाखा देऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. याला सौरसुनामीचे नाव देण्यात आले आहे. प्रत्यक्षात भूकंप झाल्याशिवाय सुनामी येत नाही. त्यामुळे या घटनेला ऊर्जेचा स्फोट म्हणता येईल. त्याचा पृथ्वीवर कितपत परिणाम होतो याबाबत मतमतांतरे आहेत.
[…]

मुंबई विनाशाच्या दिशेने…

विकासाच्या नावाखाली होत असलेल्या औद्यागिकीकरण आणि शहरीकरणासाठी समुद्र तसेच नद्या हटवून मोठ्या प्रमाणावर जमिनी तयार केल्या जात आहेत. मुंबईलगतच्या समुद्राचा मोठा भाग अशा रितीने बुजवण्यात आला आहे. त्याचे दुष्परिणामही आपण पाहत आहोत. त्यातून धडा न घेता आता समुद्राचा आणखी काही भाग बुजवण्याचा घाट घातला जात आहे. नैसर्गिक रचनेतील असा हस्तक्षेप घातक ठरणार आहे.
[…]

हमारे दो मधील व्दंव्द

भारतीय संस्कृतीमध्ये बंधुप्रेम, भगिनीप्रेम या भावनांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. एकाच आई-वडिलांच्या पोटी आलेल्या या मुलांमध्ये निसर्गत:च प्रेम आणि आपुलकी निर्माण होते असं आपण समजतो.बंधुप्रेमाचा आदर्श म्हणून राम आणि लक्ष्मण, राम

आणि भरत आपल्या मनावर ठसलेले आहेत. याच्या विपरीत उदाहरण म्हणजे महाभारतातील एकाच कुळातले बंधू! भावंडातील मत्सराची एक भयंकर कहाणी बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमध्येही आहे. यात केन याने आपल्याच एबेल नावाच्या भावाचा खून केला. कारण काय? तर दोन भावांतील वैमनस्य.
[…]

हा तर पुरुषाचाच धिक्कार

स्त्री-पुरुष संबंधांचा व त्यांच्यातील नात्याचा गाभा काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत. स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन अपत्यप्राप्तीपर्यंत जाते. म्हणून त्यांच्यातील नाते नैसर्गिक आहे, अशी पुरुषी समाजाची धारणा असते. पण जे नैसर्गिक आहे, ते नैतिक कशावरून? स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक अवस्थेत परिपूर्ण असू शकत नाहीत. त्यावर प्रेम, आदर, समानता हे संस्कार झाले, तरच ते नैतिक होतात. निव्वळ नैसर्गिक संबंध ही प्रकृती आणि अनैसर्गिक मार्गाने मिळालेले सुख ही विकृती होय. पण जेव्हा या संबंधांवर प्रेम, विश्वास आणि आदर याचा साज चढवला जातो, तेव्हाच ती संस्कृती ठरते.
[…]

लग्नं मुलांची … चिंता पालकांची

‘घर’ आणि ‘लग्न’ या दोन शब्दांशी ‘चिता’ नावाची गोष्ट जोडूनच येते. आणि माणसाच्या जीवनात या दोन्ही गोष्टींना सहसा

पर्याय नसतो. या दोन गोष्टींबद्दल चिता वाटणं हीसुद्धा एक ‘समाजमान्य’ गोष्ट आहे. त्यामुळेच विवाहसंस्था चालवत असताना

काही प्रमाणात का होईना, पालकांच्या चिता कमी करण्यात आम्हाला मदत करता येते, हा आनंदाचा भाग वाटतो.
[…]

1 122 123 124 125 126 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..