एक विशाल मन, भाग त्याचे अनेक । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे स्वभाव, सारखेच असती । फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती…३, अगणीत मनें, कोठे नसे फरक । अनेक बनली, जनक तिचा एक….४, डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे ।।१।। शरीर देई ‘सुख ‘ तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘ तयाला संबोधती ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।। ‘आनंद ‘ भावना असे एकटी नसे […]
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे । मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।। खेळांना त्या समजून घ्या– १— या मित्रांनो सारे या, हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा । स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।। एकाच दमात भिडू मारू या –२— या मित्रांनो सारे […]
वातावरण निर्मित होते, जसे जातां वागूनी । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१, फिरत असती वलये , सारी अंवती भंवती । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी । चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी….३, जाता दुष्ट व्यक्ती , आपल्या जवळूनी । चलबिचल मन होते, केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरीरि, […]
लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ….. […]