‘भारताला स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे मिळाले, गांधीजींमुळे नव्हे,‘ असे उथळ विधान जनसंघटनेच्या एका नेत्याकडून अपेक्षित नव्हते. सुदर्शनजी पुढे असेही म्हणतात की, ‘इंग्रज देश सोडून गेले, कारण त्यांचा सैन्यदलावरील विश्वास उडाला होता. आणि एवढा मोठा देश आपल्या ताब्यात ठेवणे त्यांना अशक्य वाटले.‘ शेवटचे विधान मात्र सत्य आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्य याच्यामुळे वा त्याच्यामुळे मिळाले, असे त्याचे सरळसोट उत्तर नाही व तसे ते नसणार, हे सांगावे लागेल असे कधी वाटले नव्हते. परंतु सुदर्शनजींनीच असे म्हटल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबी लक्षात आणून देणे भाग आहे. […]
‘अदान अॅण्ड ईव्हा’, ‘कटिग फ्री’ आणि ‘इराणमधून सुटका’ हे तीन दर्जेदार अनुवाद प्रकाशित केले आहेत. उज्ज्वला गोखले, सुप्रिया वकिल, विदुला टोकेकर यांनी केलेले अनुवाद वाचकांच्या मनाचा ताबा घेतातच; पण एका विदारक वास्तवाचे दर्शन घडवतात. तिनही आत्मकथने महिलांच्या जीवनलढ्याच्या कहाण्या आहेत. हा लढा त्यांनी धिरोदात्तपणे देऊन स्त्री शक्तीची ओळख करून दिली आहे. […]
‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’ आणि ‘माय फॅमिली इज ऑल आय हॅव’ ही दोन आत्मनिवेदने नुकतीच प्रकाशित झाली. दुसर्या महायुद्धानंतरची परिस्थिती आणि या परिस्थितीला धीरोदात्तपणे तोंड देणार्या बेरी बर्ग आणि हेलन डिअर यांची ही कहाणी सामान्य वाचकालाही परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. ही दोन्ही पुस्तके आत्मनिवेदनाच्या पातळीवर न राहता महत्त्वाचे दस्तऐवज ठरतात. […]
जेफ्री आर्चर, डॅन ब्राऊन, रेई किमुरा या जगप्रसिद्ध लेखकांच्या साहित्याचे अनुवाद रसिकांच्या भेटीला आले आहेत. आर्चर यांच्या धक्कातंत्राच्या कथा, रेई किमुरा यांच्या समलिगी आकर्षणाची कादंबरी तर डॅन ब्राऊन यांनी चितारलेले सामाजिक राजकीय परिस्थितीचे वास्तव वाचकांना हलवून सोडते. लीना सोहोनी, अशोक पाध्ये, निर्मला मोने यांच्या सशक्त अनुवादामुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे. […]
पूर्वी आपल्याकडे विश्वाच्या सुख-शांती आणि कल्याणासाठी विविध यज्ञ केले जात. आज या यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले तरी नासासारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांबाबत संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील हवेतील विषाणू व जिवाणू नष्ट होऊन वातावरणशुद्धी होते. यज्ञामध्ये धूप, वनस्पती, औषधी इ.ची किती प्रमाणात आहुती दिली. यावर यज्ञाचे कार्यक्षेत्र किती मोठे असेल ते ठरते. […]
परवा शेजारचे काका कौतुकाने सांगत होते, ‘आमचा सुरेश या वयात अध्यात्माकडे वळलाय. दर मंगळवारी पाच पाच तास रांगेत उभे राहून सिध्दिविनायकाचे दर्शन घेतो.’ मी जरा विचारात पडलो. सुरेश हा कॉलेजात जाणारा मुलगा. या वयात तो अध्यात्माकडे वळलाय याचे त्याच्या वडिलांना कौतुक. दुसरा भाग म्हणजे पाच तास रांगेत उभे राहिला म्हणजे अध्यात्म केले हा एक समज. रांगेत उभे राहुन दर्शन घेणे हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग. पण अध्यात्म म्हणजे काय? […]
ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा