परवा शेजारचे काका कौतुकाने सांगत होते, ‘आमचा सुरेश या वयात अध्यात्माकडे वळलाय. दर मंगळवारी पाच पाच तास रांगेत उभे राहून सिध्दिविनायकाचे दर्शन घेतो.’ मी जरा विचारात पडलो. सुरेश हा कॉलेजात जाणारा मुलगा. या वयात तो अध्यात्माकडे वळलाय याचे त्याच्या वडिलांना कौतुक. दुसरा भाग म्हणजे पाच तास रांगेत उभे राहिला म्हणजे अध्यात्म केले हा एक समज. रांगेत उभे राहुन दर्शन घेणे हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग. पण अध्यात्म म्हणजे काय? […]
ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे. […]
बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांच्या निमित्ताने अहिराणी या खानदेशी बोलीभाषेशी परिचित झालो; परंतु ती खरी अहिराणी नसून खानदेशी वऱहाडी भाषा असल्याचे प्रा. डॉ. उषाताई सावंत यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या शोधनिबंधपर पुस्तकातून आपणास ज्ञात होते. एखादी खरी व नवीन माहिती देण्याचे ध्येय या एकाच उदाहरणावरून कसे या पुस्तकास साध्य झाले आहे, ते लक्षात येते. […]
डॉ. स. रा. गाडगीळ हे एक व्यासंगवेडे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे अवघे आयुष्य शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करण्यात व्यतीत झाले. निर्वाहाची सक्ती म्हणून नव्हे; पण व्यासंग ही गाडगीळांची वृत्तीच आहे. अध्यापन विषय झालेले पुस्तक, ते लिहिणारा लेखक, तो वाङ्मयप्रकार यांचा सर्वांगीण अभ्यास करून त्या कोंदणात ते विशिष्ट पुस्तक बसवण्याची त्यांची सवय होती. आता `मराठी काव्याचे मानदंड’ अधोरेखित करणारे नवे विवेचन घेऊन मराठी अभ्यासकांसमोर ते आले आहेत. […]
प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी `संत एकनाथांचे अभंग, स्वरूप समीक्षा हा ग्रंथ लिहून मराठी संतसाहित्याच्या समीक्षेतील एक रिकामी जागा भरून काढण्याचे श्रेय अभ्यासाने प्राप्त केले आहे. रिकामी जागा भरली असे म्हणण्याचे कारण असे आहे, की अनेक अभ्यासकांनी नाथांच्या विविध साहित्यांवर साक्षेपी लिखाण केले आहे. […]
दीपक दलाल हे नाव इंग्रजी भाषेतील साहसकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी लक्षद्वीप, अंदमान, लडाख यासंबंधी साहसकथा लिहिल्या आहेत. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यासंबंधीच्या त्यांच्या साहसकथेचा अनुवाद श्री. पु. गोखले यांनी केला आहे. नावावरून हे प्रवासवर्णन वाटत असले, तरी प्रत्यक्षात ती साहसकथा आहे. गोखले यांनी इतक्या सहजतेने अनुवाद केला आहे, की हा अनुवाद आहे, हे सांगावे लागते. […]
प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर : सेंद्रियातून संजीवनी\’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे. […]