स्वतःला हिंदुसंघटक म्हणवून घेणे सावरकरांना अधिक प्रिय असले तरी प्रत्यक्षात सावरकर हे मानवतावादी होते. त्यांचे आचरण, त्यांचे बोलणे वैयक्तिक आयुष्यात अगदीच साधे होते. कवी मनाचे तर ते होतेच. हे इतकं असूनही ते क्रांतिकारक होते. सावरकरांनी केलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य पाहिले तर हा माणूस खरोखरच महात्मा किंवा महामानव आहे असे आपल्याला दिसून येईल. सावरकरांनी जवळजवळ ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी मुक्त केली आहेत. […]
चिऊताई आणि मानवाचा संबंध फार जवळचा असावा. निदान आपल्या भारतीय संस्कृतीत तरी तो फार जवळ्चा आणि लिव्हाळ्याचा असल्याच जाणवत. म्ह्णूनच तर आपण चिमणी सारख्या छोट्याश्या निरूपद्रवी पक्षालाही आपल्या ताईची उपमा देतो. भारतीय सभ्यतेत ताईच स्थान हे आईच्या तोलामोलाच मानल जात हे वेगळ सांगायला नको […]
नित्यनेमाने येणारे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ! २०१३ सरुन आता आपण प्रवेश करतोय २०१४ मध्ये. मराठीसृष्टीच्या तमाम वाचक, लेखक आणि हितचिंतकांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा. या नववर्षात आपण जे नाही संकल्प केले असतील ते पूर्णत्त्वास जावोत ही सदिच्छा. […]
नवीन वर्ष आपण कसा साजरा करतो यावरून आपली मानसिकता, आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी आणि आपल्यात असणारी सामाजिक जाणिव इ. गोष्टी स्पष्ट होत असतात. आजकाल काही लोकांच्या मते दारू पिऊन धिंगाणा घालणे म्ह्णजे नवीन वर्ष साजरा करणे होय. नवीन वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर पासूनच काय मग थर्टीफस्टला कोठे जाणार ? काय खाणार ? काय करणार […]
टीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे, वृत्तपत्र-पुस्तके वाचणे, अश्या अनेक गोष्टी जेवताना उरकल्या जातात. यातून जेवणाकडे तर दुर्लक्ष होतेच; शिवाय आप्तांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधीही आपण गमावत असतो, हे पटकन ध्यानात येत नाही. मोबाईलमुळे सर्वांशी संपर्क कमी होत चालला आहे आणि त्यातून प्रत्येक कामामध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाणही वाढले आहे. […]
पण कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ही कविता चांगलीच पाठ होती.. लग्नाची मागणी घालताना या कवितेचा आधार वाटला. “तुला पाहिलं की वाटतं देव खुप श्रिमंत असेल.. […]