गेली तीन वर्षे भातीय राजकारण आर्थिक भ्रष्टाचार या राक्षसामुळे अक्षरशः ढवळून निघालेले आहे. इतिहासाचा मागोवा घेत असताना असे आढळून येते की देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेल्या पं. जवाहरलाल नेहरु १५ ते १६ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्षरुपाने एकही आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला नाही. आरोप झाला नाही. […]
जेव्हा वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही. कोणत्या व्यवसायाचे व्यापारीकरण झाले नाही. कोणत्या क्षेत्रास ह्या व्यापारीकरणाने सोडले आहे. सन्माननिय समजली जाणारी क्षेत्रे उदा. न्याय, शिक्षण, सामाजिक इ. क्षेत्रे यापासून मुक्त आहेत असे म्हणता येईल का. […]
आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या. […]
शैक्षणिक मानसशास्त्रात “प्रबलन” ही एक सुंदर संकल्पना मांडली आहे. स्त्रीमध्ये दुसर्याचे स्वार्थ निरपेक्ष कौतूक करण्याची एक उपजतच शक्ती असते. तिच्यामुळे तिच्या भोवतीचे सहज प्रबलन होते. म्हणून स्त्रियांनी शिक्षक झाले पाहिजे. “बाई शाळा सोडून जातात.” या गंगाधर गाडगीळांच्या कथेचे हेच मर्म आहे. गुरुजी शाळा सोडून गेले असते तर नायकाला एवढे वाईट वाटले नसते. […]
ओरिसा भुवनेश्वर येथे लिंगराज मंदिरात गणेशाची एक अत्यंत भव्य आणि सुरेख मूर्ती आहे. हा गणेश शिवाची पार्श्वदेवता म्हणून आहे. तो चतुर्भुज नागोपवीत आहे. […]
बायको(सुलोचना) – माझ्या वल्लभा. मी आपले नाव घेतले नाही हो. माझे दयित, माझे प्रियकर अशा विशेषणांच्या अर्थीच मी असे म्हणते हो वल्लभा. मग म्हणू ना वल्लभा म्हणून? […]
मला माझी पोझीशन जाणवली. मी अस रस्त्यात भिजण बरोबर नाही. पोझीशन आठवताच मनानी मी म्हातारा झालो. धावत घरात आलो. टॉवेलनी डोक पुसत बाहेर पाहिल. ती लहान मुलगी पायानी पाणी उडवत जात होती. […]
बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. ….. […]