‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे त्याच्या पूजेत मग्न असणारे. तेजाच्या म्हणजे अग्नीच्या पूजेत रत असलेल्या लोकांचा समूह म्हणजे भारत. ही व्याख्याच सांगते की आपण समस्त भारतीय मूलतः तेजाचे पुजारी आहोत. ऋग्वेदाच्या पहिल्या सूक्तातील पहिली ऋचा अग्नीच्या पूजनाचीच आहे: […]
भारतीय ‘गृहलक्ष्मी’ मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, शहरी अथवा ग्रामीण असो. शिक्षित वा अशिक्षित असो. ती मर्यादित जिन्नस वापरून उत्तम स्वयंपाक करते आणि कुटुंबाला पोटभर खाऊ घालते. तशीच मर्यादित उत्पन्नामध्ये घर चालवते. घरखर्च भागवते आणि वर बचतही करते. […]
वण्य म्हणजे सौंदर्य! साध्या भाषेत सांगायचं तर ला सुंदरता! परंतु हे लावण्य प्रत्येकाच्या डोळ्यात असते. कुणाला कोणती गोष्ट सुंदर वाटेल हे सांगता येणार नाही. लावण्यवती स्त्रीचं उदाहरण घेऊ. कुणाला तिचे डोळे सुंदर वाटतात तर कुणाला तिचे ओठ सुंदर वाटतात […]
दिवसभराच्या दगदगीने शिणून अंग अंथरुणावर टाकले. तेव्हा वाटलं, लौकिकार्थाने आपला संसार पूर्ण तर झालाय. पण अजून आपली ह्या प्रपंचाच्या जोखडातून सुटका मात्र नाही. आजही मुलगा, सून, नातवंड, नवरा कशातून मोकळीक नाही. आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही. ते काही नाही. आता सोडवून घ्यायचं सगळ्यातून स्वतःला तिच्या मनात एक अभिनव कल्पना आली. […]
दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव […]
संक्रांतीचा सण आला की कासाराच्या दुकानात किंवा डोक्यावर बांगड्यांचा मोठा हारा घेऊन घरोघरी जाऊन बांगड्या भरणारी कासारीण आठवते अजून. आठ पंधरा दिवस ही धामधूम सुरू असते. पाटल्या बिलवर घेऊन दुकानात गेल्यावर आपल्या मापाच्या बांगड्या भरवल्या की कासाराच्या पाया पडून निघायचे अशी पद्धत होती. […]
संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न, गुंता सुटतो असं म्हटलं जातं. असेलही किंवा बरोबरही असेल, परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का ???? किंवा सुटतात का ????
या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया. […]
आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो. […]
‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली. […]
भरून आलंच होतं , पडणार हे वाटलंच होतं पण पुण्यांतला मे मधला पाऊस एखाद्या सिग्नल प्रमाणे पडतो फार फार तर मोठ्या चौकातल्या १८० सेकंदाच्या सिग्नल प्रमाणे ; त्यामुळे आडोशाला थांबलेले निघण्याची तयारी करण्यासाठीच थांबलेले असतात. पण आजचा नूर वेगळाच होता. तयारी तब्येतीत कोसळण्याची होती. पावसाची पहिली सर ओसरली की नंतर तो कसा पडतो ह्यावर तो किती […]